• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्यावर जमावाचा जीवघेणा हल्ला, अहिल्यानगरमध्ये वातावरण पेटलं

August 28, 2026 by admin Leave a Comment


अहिल्यानगरमधून मोठी बातमी हाती आली आहे. अहिल्यानगरमध्ये भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. अहिल्यानगरमधील नेवासा येथे ही धक्कादायक घटना घडली. भाजपचे जिल्हा उपाध्यक्षांवर जवळपास 100 हून अधिक जणांनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. शेटे यांच्यावर झालेल्या हल्ल्याने अहिल्यानगरमधील वातावरण पेटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरमधील नेवासा येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषी शेटे यांच्यावर जमावाने हल्ला केला आहे. जमावाने त्यांच्या कारची देखील तोडफोड केली आहे. जमावातील काही जणांनी त्यांच्या हातावर चाकूने वार केल्याची माहिती आहे. ही संपूर्ण घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पोलिसांनी 90 ते 100 जणांवर रात्री गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतलं आहे.

नेमकं काय घडलं?

ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणा-या मार्गावरील अतिक्रमण काढण्याची ऋषी शेटे यांनी मागणी केली होती. याच रागातून फळविक्रेत्यांकडून ऋषी शेटेंना मारण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. नगरपंचायचे सीओ आणि पोलीसांवरही हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे बोलले जात आहे. अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकासोबत वाद झाला. अतिक्रमण काढण्याची तक्रार करणारे ॠषी शेटे हे गणपती मंदिर परिसरातून जात असताना जमावाने हल्ला केला. पोलीसांनी जमावाचा प्रतिकार केल्याने ॠषी शेटे बचावले..आता घटनास्थळी पोलीसांकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कारवाईदरम्यान उपस्थितांचा गोंधळ

नेवासामध्ये नगरपंचायतीच्या पथकाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू होती. या कारवाईचा काही फेरीवाल्यांनी तीव्र विरोध केला. नगरपंचायतीच्या कारवाईदरम्यान ऋषिकेश शेटे यांची कार पथकाच्या मागाहून जात होती. त्यामुळे फेरीवाल्यांच्या मनात गैरसमज पसरला. या गैरसमजातून काही नागरिक आक्रमक झाले. त्यांनी ऋषी शेटे यांच्या कारची तोडफोड केली. शेटे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून तक्रार नोंदवणे आणि पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती मिळत आहे. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. परिसरात शांतता ठेवून सहकार्य करावे. काही अडचण आल्यास तक्रार करावी. पोलिसांशी संपर्क साधावा, दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलिसांनी केलं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे उपोषण; सदावर्ते म्हणतात, “शिंदेंचा माणूस, अटक करा!”
  • अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ
  • उद्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन, परळच्या राड्यानंतर पोलीस अलर्ट मोडवर, 800 ते 1000 पोलिसांचा बंदोबस्त
  • 30 वर्षांपूर्वी वडिलांचे स्वप्न तुटले, मुलाने घेतली टीम इंडियात एन्ट्री! अयान अकरमच्या प्रवासाची थक्क करणारी गोष्ट
  • भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर काँग्रेसच्या बड्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, राजकारणात खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in