• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विवाहबाह्य संबंधात भारतातील हे शहर बनले नंबर वन,तुम्ही कधी विचारही केला नसेल !

June 19, 2026 by admin Leave a Comment


कांचीपुरम हे एक शांत शहर, परंतू सध्या ते एका पूर्णपणे वेगळ्या कारणाने देशभरात चर्चेत आहे.महानगरातील जीवन नेहमीच आधुनिकतेची कास धरण्यात नंबर वन ठरत असते. मात्र, नव्या पद्धतीच्या विचार आणि पाश्चात्यांचे लांगुनचालनात आता देशातील इतर महानगरांना मागे टाकत भारतातील पारंपारिक शहर असलेले तामिळनाडू येथील कांचीपुरम पुन्हा देशात नंबर एकला आले आहे. विवाह झालेला असूनही गुपचूपपणे नवीन पार्टनर वा नात्याच्या शोध करणाऱ्या मध्ये प्रसिद्ध असलेल्या डेटिंग ऐप ‘एश्ले मॅडिसन’ (Ashley Madison) वर अकाऊंट उघडण्यात आता कांचीपुरम देशात नंबरवन ठरले आहे.

या Ashley Madison ऐपने मे २०२६ चे नवीन आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात कांचीपुरम येथील सर्वाधिक लोकांनी या डेटींग apps वर रजिस्ट्रेशन केले आहे. रंजक बाब म्हणजे हे कांचीपुरम शहर लागोपाठ दुसऱ्यांदा टॉपवर राहिले आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात केलेल्या सर्व्हेक्षणातही विवाह्यबाह्य नवीन नाती शोधण्याच्या शर्यतीत कांचीपुरम देशातील इतर शहरांना मागे टाकत सर्वात पुढे राहिले आहे.

या वर्षी कांचीपुरम च्या नंतर कोयंबटुर तिरुवल्लुर आणि चेन्नईचा क्रमांक लागतो. ज्यामुळे या प्लॅटफॉर्मच्या रँकींगमध्ये दक्षिण भारतीय शहरांचा दबदबा सतत वाढत आहे. एक आणखी मोठी गोष्ट म्हणजे या ऐपवर साईन – अप करण्याच्या बाबतीत भारत आता जगातील २० देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे, तर गेल्यावर्षी भारताचा क्रमांक आठवा होता.

भारतात का वाढतोय गुप्त डेटिंगचा ट्रेंड

भारतात अशा प्रकारे गुप्त डेटिंगचे ट्रेंड वाढतोय हे केवळ या आकडेवारीने सिद्ध होत नाही. या वर्षाच्या सुरुवातीलाच विवाहाबाह्य इतर नात्यांचा शोध करणाऱ्यासाठी तयार केलेल्या आणखी एक डेटिंग प्लॅटफॉर्म ‘ग्लीडन’ ( Gleeden ) ने घोषणा केली होती. भारतात त्यांच्या सब्सक्रायबरचा आकडा ४० लाखांच्या पार गेला आहे. हा आकड्यातील एका मोठ्या बदलाकडे अंगुलीनिर्देश करत आहे. भारतात लग्न आणि नात्यांसंदर्भात लोकांचा विचार बदलत चालला आहे. हाच बदल आता केवळ महानगरापर्यंत मर्यादित राहिलेला नाही.

Ashley Madison चे चीफ स्ट्रॅटेजी ऑफीसर पॉल कीबल यांनी सांगितले की, ‘ग्लोबल साइन-अपच्या बाबतीत भारताचा आठव्यावरुन थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. यावरुन कळते की भारतातील वयस्क लोक आपआपसातील लगाव, प्रायव्हसी आणि आपल्या स्वातंत्र्याबाबत कशी वेगळी दृष्टी स्वीकारत आहेत. सर्वात रंजक म्हणजे हे केवल महानगरापर्यंत मर्यादित नाही तर देशातील वेग-वेगळ्या शहरात देखील हा बदल दिसून येत आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की खाजगी जीवन आणि नवी नातेसंबंध तयार करणे आता एका भौगोलिक क्षेत्रापर्यंत मर्यादित नाही.

साल २०२४ मध्ये ग्लीडनने ( Gleeden ) टिअर -१ आणि टिअर- २ शहरांसाठी २५ ते ५० वर्षांच्या १,५०३ लग्न झालेल्या भारतीयांवर एक सर्वे केला होता. लग्न आणि विवाहबाह्य संबंधासंदर्भात बदलत्या विचारांना समजण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. या अभ्यासात समोर आले की ६० टक्क्यांहून जास्त लोक गैर-पारंपारिक नात्यांना स्वीकारण्यास तयार होते



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार
  • Rain Update : 24, 25, 26, 27, 28 जून रोजी तुफान पाऊस, थेट अतिवृष्टीने धरणं भरणार, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in