• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विराट-अनुष्का पुन्हा भारतात परतणार? मुंबई विकत घेतलं इतक्या कोटींचं अपार्टमेंट

July 27, 2026 by admin Leave a Comment


Virat Kohli-Anushka Sharma Buy New House: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या दांपत्याने मुंबईच्या वर्सोवा भागात 18.29 कोटी रुपयांना एक अलिशान अपार्टमेंट विकत घेतलं आहे. रिपोर्टनुसार, हा अपार्टमेंट अंधेरी पश्चिमेच्या प्रीमिय प्रोजेक्ट गोदरेज स्कायशोरच्या वरच्या मजल्यावर घेतला आहे. प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म Zapkey.com ला मिळालेल्या कागदपत्रांनुसार, हा फ्लॅट वर्सोवा येथील ‘गोदरेज स्कायशोर’ इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर आहे. या मालमत्तेची नोंदणी 21 जुलै 2026 रोजी करण्यात आली असून, 1.09 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि 30 हजार रुपयांचे नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे. सध्या हे स्टार कपल दोन्ही मुलांसह लंडनमध्ये राहात आहे. मिडिया आणि झगमगाटापासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र आता भारतात परतण्याचा विचार करत असल्याचं दिसत आहे. मात्र भारतात परतणार की गुंतवणूक म्हणून हा अपार्टमेंट घेतला आहे सांगणं कठीण आहे.

नवीन घराची खासियत काय?

मुंबईतील वर्सोवा भाग हा शहरातील सर्वाधिक मागणी असलेल्या आलिशान निवासी भागांपैकी एक आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक प्रमुख व्यक्ती येथे राहतात. क्रिकेटपटू विराट आणि अनुष्काने खरेदी केलेला हा फ्लॅट 2644 चौरस फुटांच्या कार्पेट एरियात परसलेला आहे. या अपार्टमेंटमध्ये 316 चौरस फुटांची एक विशेष जागा आहे. तसेच कार पार्किंगच्या जागांचाही समावेश आहे. मुंबईतील हे त्यांचे पहिले घर नाही. या कपलने यापूर्वी वरळी परिसरात एक अपार्टमेंट विकत घेतले होते. यापूर्वी विराट कोहली मुंबईत 34 कोटींचा लक्झरी फ्लॅट विकेट घेतला होता. हा फ्लॅट वरळीच्या ओमकार 1973 मध्ये विकत घेतली होता. विराट आणि अनुष्काने मुंबईजवळील सेकंड-होमसाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबागच्या झिराड गावात 37.86 कोटी रुपयांना 5 एकरहून अधिक जमीन खरेदी केली होती.

विराट कोहली मैदानात कधी परतणार?

विराट कोहलीने कसोटी आणि टी20 फॉर्मेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आता फक्त वनडे सामने खेळत आहे. नुकताच इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळला होता. या मालिकेत त्याने 48 च्या सरासरीने 109.09 च्या स्ट्राईक रेटने 144 धावा केल्या होत्या. पण भारताने ही मालिका 1-2 ने गमावली. आता वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत विराट कोहली मैदानात खेळताना दिसेल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in