• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विदर्भात मोठा धोका, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये संकट, अलर्ट जारी, 24 तासात..

May 26, 2026 by admin Leave a Comment


विदर्भात उष्णतेचा हाहाकार बघायला मिळत आहे. विदर्भात उष्णता काही कमी होताना दिसत नाही. आजही भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला. विदर्भात दिवसासोबतच रात्रीही उष्णता वाढत आहे. वर्धा, अमरावती, चंदपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेसोबतच रेड अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला. काल विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवण्यात आले. आज अकोला, नागपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. अहिल्यानगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, बीड, धाराशिव, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड आणि लातूर या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. एकीकडे उष्णता तर दुसरीकडे पाऊस अशी स्थिती राज्यात आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला. अशा जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी दुपारी 12 ते 4 घराबाहेर निघणे टाळा.

राज्यातील उष्णता वाढल्याने उष्णघाताच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. पुढील काही दिवस उष्णता कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामध्येच आजही विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने उष्णतेचा थेट रेड अलर्ट जारी केला. मालेगाव येथे सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाला. उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह दमदार पावसाची हजेरी. दिवसभराच्या उकाड्यानंतर शहरी भागात कमालीचा गारवा. आष्टी तालुक्यातील काही भागात मान्सून पुर्व पावसाने हजेरी लावल्याने उष्णतेपासून नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला असून, ग्रामीण भागात पेरणी पुर्व शेती मशागतीला या पावसाचा चांगलाच फायदा होणार असल्याने शेतकरी थोडेसे समाधीनी झाले आहेत. आष्टी, बीड सांगवी भागात पावसाने हजेरी लावली आहे.

लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे, त्यामुळे दुपारनंतर उन्हाची तीव्रता कमी होऊन उष्णता कमी झाली आहे. निलंगा आणि औसा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. आजही लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत…
  • कुणालचा हट्ट आयफोन नव्हताच, आजोबांचा हादरवणारा खुलासा, खवड्या डोंगरावर पोहोचण्याचं धक्कादायक कारण समोर..
  • विरोधकांना महिला आरक्षण 2034 पर्यंत रेटून न्यायचंय; देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक आरोप
  • सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत…केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
  • पती अन् सासूने टॉयलेट क्लीनर पाजल्याचा आरोप अन् व्हेंटिलेटरवर झुंज, विवाहीतेचा अखेर मृत्यू

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in