• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विजय थलपतीचं साईबाबांकडे विजयासाठी साकडं; शिर्डीत सुपरस्टारला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी

April 29, 2026 by admin Leave a Comment


दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपती याने आज साई दरबारी हजेरी लावली. अभिनेता ते नेता बनलेला विजय थलपती शिर्डीत येणार असल्याची माहिती मिळताच त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

विजय थलपतीचे आगमन होताच चाहत्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चाहते आणि भाविकांच्या मोठ्या गराड्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्थेत त्याला साई मंदिरात नेण्यात आले.

विजय थलपतीने सर्वप्रथम द्वारकामाई मंदिराचे दर्शन घेतले, त्यानंतर साई समाधीवर माथा टेकवत प्रार्थना केली. काही वेळ समाधीस्थळी थांबत त्याने साईबाबांचे दर्शन घेतले आणि ध्यानमंदिरात काही क्षण ध्यान करत नामस्मरणही केले.

विशेष म्हणजे, मोठी गर्दी असूनही विजयने काही भाविकांना नमस्कार करत आपला साधेपणा जपल्याचे पाहायला मिळाले.

विजय थलपती सध्या तामिळनाडूच्या राजकारणात सक्रिय झाला असून TVK या पक्षाची स्थापना करत विधानसभा निवडणुकीत तब्बल 233 उमेदवार उतरवले आहेत. तामिळनाडूमध्ये सध्या DMK, AIDMK आणि TVK अशी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. 24 एप्रिल रोजी मतदान पार पडले असून 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Video : बॅटमध्ये AI चिप असल्याचा आरोप, वैभव सूर्यवंशीने एका वाक्यात संपवला विषय
  • पोस्ट ऑफिसची NSC योजना, 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर मिळवा 7.7 टक्के व्याज, जाणून घ्या सर्व नियम आणि फायदे
  • 690 किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, हुंडई आयोनिक 5 फेसलिफ्ट भारतात लाँच
  • मोठी बातमी! इराणमध्ये सत्तापरिवर्तन, मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल हादरवणारी माहिती, जगभरात मोठी खळबळ
  • Motorola घेऊन येत आहे त्यांचा नवीन फोल्डेबल स्मार्टफोन, किंमत आणि दमदार फिचर्स झाले लीक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in