• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?

August 15, 2026 by admin Leave a Comment


राजधानी दिल्लीसह देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत त्यांनी सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आणि सीमेवरील सैनिकांना आदराने स्मरण केले. गेल्या ८० वर्षांत देशाने केलेली प्रगती, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील वाटचाल कौतुकास्पद असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, राज्य देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ८.८% आर्थिक विकास दर नोंदवला आहे. १३ जिल्ह्यांनी विकासाची उद्दिष्ट्ये पूर्ण केली आहेत आणि गडचिरोली, पालघर, नंदुरबारसारख्या दुर्गम भागांपर्यंत विकास पोहोचवला जात आहे.

शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना, ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी आणि दिवसा वीजपुरवठा करण्याचे १००% उद्दिष्ट लवकरच पूर्ण केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राची भावी पिढी दुष्काळ पाहणार नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवले जात आहेत. महिलांना शेतकरी दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. युवकांसाठी शिक्षण आणि रोजगाराच्या संधी निर्माण करून, महाराष्ट्र देशाचे ‘स्टार्टअप कॅपिटल’ बनले आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in