• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वाल्मिक कराड गँगचा तुरुंगात राक्षसी खेळ, कैद्याला धरुन…हादवरून टाकणारी ऑडिओ क्लीप समोर!

April 22, 2026 by admin Leave a Comment


Walmik Karad Gang : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी सध्या कारागृहात आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने सध्या त्यांना कारागृहात ठेवण्यात आलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आल्यानंतर या प्रकरणातील कराड गँगचे एकएक क्रूर कारनामे समोर आले होते. बीड जिल्ह्यात या गँगची कशी दहशत होती, हे सांगणारे अनेक धक्कादायक प्रसंग समोर आले होते. दरम्यान, आता ही गँग तुरुंगात असली तरीही त्यांचे कारनामे संपता संपत नाहीयेत. तुरुंगातच या गँगकडून दहशत पसरवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार बसण्याच्या जागेवरून या गँगने एका कैद्याला मारहाण केली आहे.

जेलमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद

सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतर गुन्ह्यातील आरोपी शंकर शेप या तिघांनी मिळळून एका कैद्याला मारहाण केली आहे. तुरुंगातील बॅरिकेटमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाला होता. अगोदर कैद्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. नंतर कैद्याला मराहाण करण्यात आली. कराड गँगच्या सदस्यांनी तुरुंगातील अझर अब्दुल रहमान पठाण या कैद्याला मारहाण केल्याचे बोलले जात आहे.

मला तुरुंग बदलण्याची धमकी

या कथित मारहाणीसंदर्भात एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये अझर अब्दुल रहमान पठाण हा कैदी बोलताना दिसत आहे. माझ्या हाताला गंभीर मार लागला आहे. मला मारहाण झाली. जेल प्रशानस माझं काहीही ऐकून घेत नाही. जेल प्रशासनाने त्यांच्याकडून पैसे खाल्ले आहेत. जेलरला याबाबत माहिती दिली. परंतु ते माझं काहीही ऐकायला तयार नाहीत. माझ्यावर दमदाटी केली जात आहे. माझा तुरुंग बदलण्याची धमकी दिली जात आहे, असं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला येत आहे.

मला वाल्मिक अण्णाकडे बोलवलं जात आहे

तसेच कुठेही तक्रार कर. माझं कोणीही काहीही करू शकत नाही, असं मला धमकावलं जात आहे. मला दवाखान्यातही नेलं जात नाहीये. मला मारहाण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज आहे. जेलमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाला होता, असाही उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याचाही उल्लेक आहे. वाल्मिक अण्णाकडे मला बोलवलं जात आहे, असाही आरोप या कथित ऑडिओ क्लिपमध्ये होताना दिसतोय. दरम्यान या संदर्भात जेल प्रशासनाने मारहाण झालेल्या कैद्याला विचारणा केली परंतु कैद्याने कोणतीही तक्रार केली नसल्याचे कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी सांगितले.

(टीप- कथित ऑडिओ क्लिपची पुष्टी टीव्ही 9 मराठी करत नाही)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सहकारी बँक घोटाळ्यातून निर्दोष सुटका,रोहित पवार यांची पोस्ट,म्हणाले घायल हूँ, इसलिए घातक हूँ”
  • Beed | वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्…
  • ‘पंचायत’ फेम अभिनेत्यासोबत जातीभेद; मंदिरात प्रवेश नाकारला, हॉटेलमध्ये जेवणाची ताटं धुवायला लावली
  • Todays Gold Rate: सोन्याचा भाव किती? अजबच चमात्कार घडला, पहिल्यांदाच 10 ग्रॅमची किंमत…
  • घरच्या घरी शेवग्याच्या शेंगांपासून बनवा लोणचे, झटपट जाणून घ्या रेसिपी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in