• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Beed | वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्…

April 22, 2026 by admin Leave a Comment


बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर कराड गॅंगपैंकी अनेक जणांना अटक करण्यात आली होती. या आरोपींनी आता कारागृहात देखील दहशत माजवली आहे. वाल्मिक कराड गँगशी संबंधित काही आरोपींनी एका कैद्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेनंतर कारागृहातील वातावरण तणावपूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. जिल्हा कारागृहात घडलेल्या एका घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

माहितीनुसार, बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून ही घटना घडली. या वादात काही आरोपींनी अझर पठाण नावाच्या कैद्याला मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. घटनेनंतर कैद्यांमध्ये वाद वाढला आणि शाब्दिक बाचाबाचीही झाली.

दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये संबंधित कैद्याने मारहाणीबरोबरच जेल प्रशासनावरही गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे कारागृहातील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत असून, सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 23 एप्रिलचा दिवस म्हणजे लाखात एक, या लकी राशींच्या नशिबात होणार चमत्कार; वाचा राशीभविष्य!
  • भाषणातून तृणमूलची निराशा स्पष्ट दिसून येतीये, आता जनतेचा निर्धार…, धर्मेंद्र प्रधान यांचा जोरदार हल्लाबोल
  • ‘या’ सोप्या टीप्सने किचनमधील कामे झटपट होतील पूर्ण, तुमचं काम होईल सहज
  • Thane Water Shortage News | ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सर्व्हिस सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
  • 3 तास 15 मिनिटांचा सिनेमा 33 वर्षांनंतर होतोय ट्रेंड! पाहाताना कोसळेल रडू, OTTवर नक्की पाहा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in