• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘पंचायत’ फेम अभिनेत्यासोबत जातीभेद; मंदिरात प्रवेश नाकारला, हॉटेलमध्ये जेवणाची ताटं धुवायला लावली

April 22, 2026 by admin Leave a Comment


‘पंचायत’ या गाजलेल्या वेब सीरिजमध्ये सचिवची भूमिका साकारलेला अभिनेता विनोद सूर्यवंशी याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जातीभेदाविषयी धक्कादायक खुलासा केला. कर्नाटकमधल्या गावात त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना जातीभेदाला सामोरं जावं लागल्याचं त्याने सांगितलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. आजही त्याच्या कुटुंबीयांना मंदिरात किंवा लोकांच्या घरात प्रवेश करण्याची परवानगी नसल्याचं त्याने सांगितलं आहे. आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत विनोद म्हणाला, “कर्नाटकमध्ये माझ्या गावी आजसुद्धा जातीभेद आहे. त्या गावात दोन क्षेत्र आहेत. एक उच्च जातीसाठी आणि एक खालच्या जातीसाठी. दलितांचा परिसर गावापासून वेगळा आहे.”

मंदिरात प्रवेश नाकारला

बालपणीच्या एका घटनेची आठवण काढत विनोदने पुढे सांगितलं, “मी 12 वर्षांचा असताना माझ्या वडिलांसोबत गावी गेलो होतो. तिथे आम्ही एका हॉटेलमध्ये जेवलो आणि त्यानंतर आम्हालाच आमची ताटं धुवावी लागली होती. जेवणाचा बिल तर आम्ही भरलाच होता, पण तरीही आम्हाला तशी वागणूक मिळाली होती. माझ्या गावात आजसुद्धा असं एक मंदिर आहे, जिथे आम्हाला जाण्याची परवानगी नाही. मी सतत माझ्या आईवडिलांना रडताना पाहिलंय. जेव्हा सण-उत्सव असायचे, तेव्हा मला आणखी वाईट वाटायचं. दिवाळी वगैरे हे सण का येतात, असा मी विचार करायचो. कारण इतरांसारखं आम्हाला सण-उत्सव साजता करता येत नव्हतं, म्हणून मला आणखी वाईट वाटायचं. आम्ही परिस्थिती खूप बिकट होती. जेव्हा कोणी आमची मदत करत असे, तेव्हाच आम्ही सण-उत्सव साजरा करू शकत होतो.”

अपमान सहन केला

मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी विनोदने पैसे कमावण्यासाठी अनेक लहान-मोठ्या नोकऱ्या केल्या होत्या. “मी सर्वात आधी लिफ्टमॅनचं काम केलं होतं, त्यासाठी मला महिन्याला 1600 रुपये मिळायचे. त्यानंतर मी कंस्ट्रक्शन ऑफिसमध्ये ऑफिस बॉयचं काम केलं, नंतर सिक्युरिटी गार्डचंही काम केलं. माझी 12 तासांची सलग ड्युटी असायची. कधी कधी लोक मला शिवीगाळही करायचे. मी खूप काही सहन केलंय. लोक म्हणतात की कोणतंच काम छोटं नसतं, परंतु मी हे पाहिलंय की माणसाचं मूल्य हे त्याच्या कामाच्या स्तरावरूनच ठरवलं जातं. जेवढं काम मोठं, तितका त्याला आदर मिळतो.”

विनोद सूर्यवंशीने ‘जानवर’, ‘थामा’, ‘सत्यमेव जयते’ आणि ‘जॉली एलएलबी 3’ यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • LSG vs RR : लखनौचा सलग चौथा पराभव, राजस्थानकडून 40 धावांनी धुव्वा
  • पाच मसाले जे उन्हाळ्यातही ठेवतील तुम्हाला थंड, सेवन आहे खूपच लाभकारक
  • Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषद निवडणूकीसाठी वर्षावर खलबते, सहा जागांसाठी भाजपात १२ इच्छुक, कोणाला लॉटरी ?
  • सामान्यांना सर्वात मोठा दणका, पेट्रोलचा भाव 25 रुपयांनी वाढणार? लवकरच…चिंता वाढली!
  • SAW vs INDW, 3rd T20i : टीम इंडियातून दोघींचा पत्ता कट, अमरावतीकर खेळाडूला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in