• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वाचवा त्याला, त्याच्या जीवाला धोका, अभिजीत दिपके याच्या बहिणीचे गंभीर आरोप, थेट राष्ट्रपतींना पत्र..

July 25, 2026 by admin Leave a Comment


जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टीकडून नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात आंदोलन केले जातंय. सरकारसोबत कॉकरोच जनता पार्टीचे शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी गेले होते. सरकारकडून त्यांच्या प्रमुख 3 मागण्यांपैकी 2 मान्य मान्य करण्यात आल्या. सर्वात महत्वाची तिसरी मागणी अजूनही सरकारने मान्य केली नाही. कॉकरोच जनता पार्टीकडून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याकरिता आज दुपारपर्यंत सरकारने वेळ मागितला. आज पुन्हा बैठक होणार आहे. कॉकरोच जनता पार्टीने स्पष्ट केले की, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन थांबणार नाही आणि जंतर मंतरवर आंदोलन सुरूच राहिल. या आंदोलनाची धग पार देशभरात पोहोचली आहे. विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत आहेत.

अभिजीत दिपके यांनी सरकारपुढे काही मागण्या ठेवल्या आहेत. मात्र, यादरम्यानच अभिजीत दिपके यांच्या कुटुंबियांना प्रचंड चिंता वाटत आहे. अभिजीत दिपके याच्या जीवाला धोका असल्याचे नुकताच त्याच्या कुटुंबियांनी म्हटले. यासोबतच त्यांनी दिल्ली पोलिसांवर आरोप केला. दिल्ली पोलिसांवर आमचा अजिबात विश्वास नसल्याचे अभिजीत दिपके याच्या कुटुंबियांनी म्हटले.

हेच नाही तर अभिजीत दिपके याच्या बहिणीने थेट राष्ट्रपतींना एक निवेदन दिले असून महाराष्ट्र पोलिसांनी अभिजीत दिपके याला सुरक्षा पुरवावी, असे त्याच्या बहिणीने म्हटले. दिल्ली येथील जंतरमंतरवर CJP चे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे उपोषण सुरू आहे. दिल्ली पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर झालेला भ्याड लाठी हल्ला पाहता अभिजित दिपके यांच्याही जिवाला धोका असल्याची शक्यता दिपके यांची बहीण स्नेहा जितिन वंजारे यांनी वर्तवली आहे.

दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही, त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांची विशेष सुरक्षा प्रदान करावी अशा मागणीचे निवेदन बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे देण्यात आले. अभिजित दिपके याचा त्याच्या कुटुंबासोबत अद्याप संपर्क झाला नाही, त्यामुळे आम्हाला भीती वाटते आहे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामध्येच अभिजीत दिपके याची तब्येत खराब झाल्याचीही माहिती पुढे येत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in