• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वर्षभरात बंपर कमाई… हे पीक म्हणजे रेकॉर्ड ब्रेक पैशांची छपाई, प्रत्येक हंगामात लॉटरी

July 12, 2026 by admin Leave a Comment


Tomato Farming Tips: भारतीय स्वयंपाकगृहात टोमॅटोशिवाय जेवण जणू अपूर्णच आहे. अनेकांना जेवणात टोमॅटो लागतो. बाजारात टोमॅटोची मागणी कमी होत नाही. शेतकऱ्यांसाठी हे पैसा देणारे पीक आहे. विशेष म्हणजे बारामाही टोमॅटोची मागणी असते. अधिक फायद्यासाठी टोमॅटोची चांगले वाण निवडणे गरजेचे असते. विविध हंगामात टोमॅटोच्या विविध जाती उपयोगी ठरतात. काही जणांना गावरान, तर काहींना वैशाली टोमॅटो आवडते. पारंपारिक शेतीत थोडा बदल केला तर शेतकर्‍यांना मोठा फायदा होऊ शकतो.

हायब्रिड शेतीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळते. विविध किडीचा प्रार्दूभाव टळतो. कृषी शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या काही खास जातीच्या टोमॅटोच्या वाणांना सध्या अधिक मागणी आहे. चांगल्या उत्पादनासाठी या वाणांची मागणी वाढली आहे. यामुळे खतासह फवारणीचा खर्चही टळतो. बाजारात भाव सुद्धा चांगला मिळतो.

पुसा आणि अविनाश-2 ची बाजारात जोरदार मागणी

टोमॅटोच्या सर्वात चांगल्या वाणात पुसा शीतल हे नाव आघाडीवर आहे. टोमॅटोची ही जात अत्यंत थंडीतही चांगले उत्पादन देते. कमी तापमानातही उत्पादनात घट येत नाही. त्यानंतर पुसा हायब्रिड-1 ही जात शेतकरी लावतात. तिचे लालचटक फळ हातोहात विक्री होते. याचे झाडही मजबूत असते आणि त्याला टोमॅटो ही भरपूर येतात.

अविनाश-2 वाणावरही शेतकरी फिदा आहेत. लीफ कर्ल या रोगासाठी ही जात एकदम खास मानली जाते. या जातीवर या रोगाचा परिणाम होत नाही. तोडीनंतरही हे टोमॅटो अनेक दिवस चांगले राहते. त्यामुळे दूरच्या बाजारपेठेत माल पाठवण्यासाठी हे वाण शेतकरी निवडतात.

अर्का रक्षक आणि अर्का सम्राट

बंगळुरूतील IIHR ने हे वाण विकसीत केले आहे. अर्का रक्षक आणि अर्का सम्राट उत्पादनात अग्रेसर आहेत. अर्का रक्षस ही टोमॅटोची जात तीन वेगवेगळ्या घातक कीड आणि बुरशीसोबत लढण्यास सक्षम मानली जाते. या टोमॅटोचे वरील आवरण मजबूत असते. दूरच्या बाजारपेठेत पाठवण्यासाठी हे टोमॅटो चांगले मानले जाते.

तर अर्का सम्राट या वाणाच्या टोमॅटोचा आकार मोठा असतो. गर्द लाल रंगाचे फळ येते. प्रति हेक्टर हे वाण 80 ते 100 टनपर्यंत बंपर उत्पादन देते. विशेष बाब म्हणजे अर्का रक्षक आणि अर्का सम्राट ही दोन्ही फळ दीर्घकाळापर्यंत ताजी राहतात. या टोमॅटोच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना जबरदस्त फायदा होतो.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in