• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वरळी एनएससीआय डोम म्युझिक कॉन्सर्ट तरुणाचा मृत्यू प्रकरण;पोलिसांनी केला गुन्हा दाखल

June 7, 2026 by admin Leave a Comment


वरळी येथील एनएससीआय डोममध्ये झालेल्या या एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान शनिवारी रात्री एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या ‘Klangkuenstler’च्या लाईव्ह म्युझिक शो दरम्यान एक तरुण आणि तरुणी बेशुद्ध पडल्याची घटना आधी घडली. या तरुणाला रुग्णालयात नेले असताना त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले होते. तर तरुणीवर उपचार सुरु असून तिची तब्येत स्थिर असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात आता ताडदेव पोलिस ठाण्यात आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरळीच्या एनएससीआय डोममध्ये ‘Klangkuenstler All Night Long’ प्रकरणात वृषभ महेंद्र गांगुर्डे (२८) तरुणाचा मृत्यू झाला आणि त्याची मैत्रिणी बेशुद्ध पडल्याची घटना घडली होती. या प्रकरणात प्राथमिक माहितीनुसार या तरुणांनी अतिप्रमाणात मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले होते. जर्मन डीजे ‘Klangkuenstler’च्या लाईव्ह म्युझिक शो दरम्यान या तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणाती तरुणीची प्रकृती आता स्थिर असून ती डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे.

चौकशीसाठी ताब्यात घेतले

दरम्यान या प्रकरणात ताडदेव पोलिसांनी बीएनएसच्या कलम १०६ ( १ ), २८९ आणि ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्याची जबाबदारी असलेल्या ‘स्पेस बाऊंड’ या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, तिचे सीईओ करण सिंग आणि वरिष्ठ व्यवस्थापक पराग ओक यांच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. करण सिंग आणि पराग ओक या दोघांनाही चौकशीसाठी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस सूत्रांनुसार, कार्यक्रमाच्या आयोजकांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कार्यक्रमस्थळी पुरेशी वैद्यकीय व्यवस्था केली नाही, असा आरोप आहे.कार्यक्रमाच्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांनुसार अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी आपत्कालीन वैद्यकीय मदतीचा अभाव होता असे उघडकीस आले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Prajakta Mali: प्राजक्ता माळीवरचा ‘फरसाण’ जोक नेमका कुठून आला? हास्यजत्रेच्या अभिनेत्याने सांगितला सेटवरचा भन्नाट किस्सा
  • इराणचा भारताला मोठा दणका, थेट भारताविरोधात पाकिस्तानला मदत, हादरवणारा खुलासा..
  • शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
  • वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
  • Sugar Price Hike: ना सरकारमुळे, ना दुकानदारांमुळे… तर नागरिकांमुळेच वाढले साखरेचे दर, भलतंच कारण आलं समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in