• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वडिलांकडून रिलेशनशीपचे सल्ले घेतो का? आमिर खानच्या लेकाचे उत्तर ऐकून तुम्हालाही हसू येईल

July 10, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हे आमिर खानचे तिसरे लग्न आहे. यापूर्वी त्याचा पहिला विवाह रीना दत्ता यांच्याशी झाला होता. या लग्नानंतर त्यांना जुनैद खान आणि इरा खान ही दोन मुले झाली. दुसरा विवाह किरण रावशी झाला. किरण आणि आमिरला आझाद नावाचा मुलगा आहे. आता त्याचा तिसरा विवाह गौरी स्प्रॅटशी झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमिर खानच्या वैवाहिक जीवनावर आणि नातेसंबंधांवर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. दरम्यान, जुनैद खानचा एक जुना व्हिडीओ एक्सवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत जुनैद आपल्या वडिलांकडून रिलेशनशिपबाबत सल्ला घेतो का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्याने दिलेल्या उत्तराने अनेकांना हसू अनावर झाले आहे.

जुनैद खानचा जुना इंटरव्यू व्हायरल

हॉटरफ्लाईला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत आमिर खानचा पुत्र आणि अभिनेता जुनैद खानने डेटिंग आणि रिलेशनशिपबाबत पालकांकडून सल्ला घेण्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “डॅडकडून रिलेशनशिपचा सल्ला मी फारसा घेत नाही.” हे ऐकून सर्वांना हसू अनावर झाले आहे.

जुनैद पुढे म्हणतात, “माझी मुले माझे ऐकत नाहीत, असे तो (आमिर) नेहमी म्हणत असतो. बहुतेक वेळा मी माझ्या आईशी बोलतो. मी कदाचित १७ किंवा १८ वर्षांचा असेन. आम्ही सर्वजण एकत्र होतो. अचानक माझ्या वडिलांनी म्हटले, ‘जुनैद, आपण बोलायला हवे.’ मी म्हटले, ‘कोणत्या विषायावर?’ मी जाणून घेत होतो की ते कशाबद्दल बोलत आहेत. पण माझ्या आईने म्हटले, ‘तो १७ वर्षांचा आहे आणि त्या गोष्टी कधीच झाल्या आहेत.’”

Junaid Khan cooked his father aamir khan:-

” I don’t take relationship advice from my father, he’s failure in relationships and this is why he keeps saying “mere bacche meri sunte nhi hai”, I take it from my mother”.

Imagine not being respected by your own son & family members… pic.twitter.com/vbI2Yd5sNM

— daksh. (@mythicbxrn) July 9, 2026

आमिर खानचे तिसरे लग्न

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानने रविवारी गौरी स्प्रॅटशी लग्न केले. रीना दत्ता आणि किरण राव यांच्यानंतर आमिरचे हे तिसरे लग्न आहे. आमिर खानने १९८६ मध्ये रीना दत्ताशी विवाह केला होता. त्यांना दोन मुले आहेत – जुनैद खान आणि इरा खान. २००२ मध्ये दोघे वेगळे झाले. त्यानंतर २००५ मध्ये आमिरने किरण रावशी दुसरा विवाह केला. या विवाहात सरोगसी पद्धतीने आजाद राव खानचा जन्म झाला. मात्र, २०२१ मध्ये दोघांनी वेगळे होण्याची घोषणा केली.

जुनैद खानबद्दल

जुनैद खानने नेटफ्लिक्सवरील विवादास्पद चित्रपट ‘महाराज’मधून अभिनयाची सुरुवात केली. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. त्यानंतर त्याने खुशी कपूरसोबत ‘लव यापा’ चित्रपट केला, जो बॉक्स ऑफिसवर मोठा फ्लॉप ठरला. त्यानंतर साई पल्लवीसोबत ‘एक दिन’ चित्रपटही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! महाराष्ट्र ड्रग इंस्पेक्टर परीक्षा रद्द, पेपर लीकचा आरोप झाल्यानंतर मोठा निर्णय
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
  • वैभव सूर्यवंशीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला पाहिजे…थेट BCCI अन् ICC कडे केली तक्रार, असं का?
  • इस्लामची पुस्तके वाचा, नाहीतर मुलाला दहशतवाद्यांना विकून टाकेन… तिघांच्या मृत्यूनंतर कोचचे काळे कृत्य उघड
  • Sugar price hike : मोठा निर्णय! 5 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही, डी मार्ट, बिगबास्केट आणि ब्लिंकिट… कंपन्यांनी बंदी का घातली?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in