• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वजन कमी करण्यासाठी ‘या’ 2 बिया ठरतील लाभदायक, जाणून घ्या महत्त्व…

August 4, 2026 by admin Leave a Comment


तासनतास एकाच जागी बसून राहणं, योग्य शारीरिक हालचालींचा अभाव आणि अस्वास्थ्यकर पदार्थ खाणं, या कारणांमुळे लठ्ठपणाची ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, वाढलेलं वजन नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी लोक विविध आहारांचं पालन करतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आहारात भोपळ्याच्या बिया आणि चिया बियांचा समावेश केल्यास आश्चर्यकारक परिणाम मिळतात. तर जाणून घ्या भोपळ्याच्या बिया आणि चिया बियांचे आरोग्यास होणारे फायदे…

भोपळ्याच्या बिया: भोपळ्याच्या बियांना पोषक तत्वांचा खजिनाच म्हणता येईल. शरीराला आवश्यक असलेले प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, झिंक आणि लोह यांसारखी महत्त्वाची पोषक तत्वे त्यांमध्ये भरपूर प्रमाणात असतात. विशेषतः, त्यातील फायबरमुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं. यामुळे जंक फूड किंवा स्नॅक्स वारंवार खाण्याची सवय अगदी सहजपणे नियंत्रणात आणता येते.

चिया बिया: चिया बिया आकाराने लहान असल्या तरी, त्यांचे आरोग्यदायी फायदे अफाट आहेत. त्यांमध्ये शरीरासाठी उत्तम असलेले फायबर, प्रथिने, ओमेगा-3 फॅटी ॲसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यांना वजन कमी करायचं आहे आणि आपले हृदय निरोगी ठेवायचं आहे, त्यांच्यासाठी चिया बिया हा एक उत्तम पर्याय आहे.

भोपळ्याच्या बिया आणि चिया बिया या दोन्हींमध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मदत करतात. फायबर आपल्याला जास्त खाण्यापासून रोखते आणि कॅलरीज नियंत्रित करते. प्रथिने आपल्या शरीराची चयापचय क्रिया वाढवतात आणि दिवसभर आपल्याला उत्साही ठेवतात. म्हणून, ज्यांना वजन कमी करायचे आहे, ते आपल्या आवडीची एक गोष्ट किंवा या दोन्हींचे मिश्रण आपल्या आहारात समाविष्ट करून चांगले परिणाम मिळवू शकतात

बियांचा तुमच्या आहारात समावेश कसा करायचा याबद्दल देखील जाणून घ्या… या बियांचा तुमच्या रोजच्या आहारात समावेश करणं खूप सोपं आहे. भोपळ्याच्या बिया सामान्यपणे चावून किंवा हलके भाजून संध्याकाळी नाश्ता म्हणून खाल्ल्या जाऊ शकतात. चिया बिया रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी थोड्या लिंबाच्या रसासोबत प्यायल्या जाऊ शकतात. किंवा तुम्ही त्या तुमच्या रोजच्या स्मूदी, फळांच्या रसात किंवा ओटमीलमध्ये मिसळून आनंदाने खाऊ शकता.

बिया केवळ वजन कमी करण्यासाठीच चांगल्या नाहीत, तर पोटाशी संबंधित अनेक समस्यांवरही नियंत्रण ठेवतात. त्या पचनक्रिया सुधारतात आणि गॅस, अपचन, बद्धकोष्ठता व पोटदुखी यांसारख्या समस्या कमी करतात. पण आहात कोणतेही बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तिरंग्याच्या रंगातील गाऊनने उर्वशी रौतेला ट्रोल; कायदा नेमका काय सांगतो?
  • रेल्वेतून ब्लँकेट्स, चादरी चोरली? मग दंडासह इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास
  • कचोरीत उंदराच्या लेंड्या ? छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये भवानी स्वीटवर FDAची कारवाई
  • अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही ट्रॅक्टरचे पुढचे टायर छोटे आणि मागचे टायर मोठे का असतात? कारण आहे खास
  • रक्षाबंधनाला बहिणीला कोणते खास गिफ्ट? Coin, Jewellery वा Digital Gold? हा पर्याय एकदम स्मार्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in