• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लोहगडावर जाण्याचा आग्रह कुणाचा? सियाच्या आईचा खळबळजनक दावा काय?; व्हिडिओ कॉलवरूनच…

June 26, 2026 by admin Leave a Comment


केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला लोहगडावर जाण्यासाठी सियानेच केतनला आग्रह धरला होता. त्याला केतनचा विरोध होता. सियाने हट्ट धरला आणि भांडण केल्यानेच केतन तिच्यासोबत लोहगडावर गेल्याची चर्चा होती. मात्र, या चर्चेला सियाची आई पूजा गोयल यांनी छेद दिला आहे. त्यांनी घटनेच्या आदल्या दिवशी काय घडलं? याचा तपशीलच दिला आहे. तसेच सियाने लोहगडावर जायचा आग्रह धरला नव्हता तर तिने विरोध केला होता, असा दावाच पूजाच्या आईने केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला आता नवे वळण लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

सिया गोयलची आई पूजा गोयल यांनी पहिल्यांदाच मीडियाला प्रतिक्रिया दिली आहे. सियाने लोहगडावर जाण्याचा आग्रह धरला नव्हता, असा दावा पूजा गोयल यांनी केला आहे. आदल्या दिवशी सिया आणि केतनचं फोनवर बोलणं सुरू होतं. व्हिडिओ कॉलवर दोघे बोलत होते. व्हिडिओ कॉलिंगमध्ये केतनची आई आली होती. तेव्हा सिया म्हणाली, आई केतन लोहगडावर ट्रेकिंगला जायचं म्हणत आहे. त्यांना लोहगडावर जायला मना करा. मला लोहगडावर जायचं नाहीये. मला ट्रेकिंग नाही करायचं. दुसऱ्या दिवशी वाढदिवसाचं फंक्शनही आहे. त्यामुळे आराम करायचा आहे. त्यावर केतनची आई म्हणाली, तू लोहगडावर जा, असा दावा पूजा गोयल यांनी केला. या दोघांच्या संभाषणाची मोबाईलमध्ये चॅटिंग आहे. चॅटवरही सियाने मला लोहगडावर जायचं नाहीये म्हणून सांगितलं होतं. पण केतनने जायचा आग्रह धरला होता, असंही पूजा गोयल म्हणाल्या.

केतन गेल्याचा धक्का बसला

केतन गेल्याचं कळलं आणि मला धक्का बसला. हे काय झालं कळेनासं झालं? केतन गेल्याचं जेवढं दु:ख त्यांच्या कुटुंबाला आहे, तेवढंच आम्हाला आहे. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. जर यात माझी मुलगी दोषी असेल तर तिलाही त्याच कड्यावरून ढकलून दिलं पाहिजे. मुलगी दोषी असेल तर तिलाही शिक्षा झालीच पाहिजे, असं पूजा गोयल यांनी सांगितलं.

ही वेळ आली नसती

सिाचं अफेयर असल्याचं कधी माहित नव्हतं. केतन आणि सियाचं चांगलं बाँडिंग होतं. केतनला तिच्या अफेयरबाबत माहिती असेल तर त्याने त्याबाबत तिच्या आईवडिलांशी किंवा आमच्याशी बोलायला हवं होतं. तिच्या आईवडिलांनीही आमच्याशी बोलायला हवं होतं. आम्ही सियाला समजावलं असतं किंवा लग्न मोडलं असतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. केतनने सियाच्या अफेयरबाबत सांगितलं असतं तर आज ही वेळ आली नसती, असंही त्या म्हणाल्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in