• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लोकलमध्ये महिलेला मारहाण करणाऱ्याला 12 तासात बेड्या, रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई

August 7, 2026 by admin Leave a Comment


मुंबई लोकलमध्ये गेल्या काही काळापासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. आज मुंबई लोकलमधला एक खळबळजनक व्हिडिओ समोर आला होता. यात एक व्यक्ती आणि एक महिला यांच्यात जोरदार वाद होत आहे. या व्हिडिओत ती व्यक्ती वारंवार त्या महिलेला धमकावताना, शिवीगाळ करताना दिसत आहे. नंतर हा व्यक्ती कंबरेचा बेल्ट काढत महिलेच्या अंगावर धावून जात असल्याचे पहायला मिळाले होते. त्यानंतर त्याने महिलेला मारहाण केल्याचेही समोर आले होते. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पोलिसांकडून आरोपीला अटक

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण करणाऱ्या आरोपीला गोवंडीतून अटक करण्यात आली आहे. मोहमद रिझवान अन्सारी असं या आरोपीचे नाव असून त्याला रेल्वे पोलिसांनी गोवंडीतून ताब्यात घेतले आहे. महत्वाचं म्हणजे आरोपीच्या दाव्यानुसार मारहाण झालेली महिला नसून तृतीयपंथी व्यक्ती होती. सध्या पोलीस पीडित व्यक्तीचा देखील शोध घेत आहेत, त्याचसोबत ती व्यक्ती महिला होती की तृतीयपंथी होती याची पडताळणी सुरु आहे. आता पोलीस मारहाण प्रकरणात योग्य ती कारवाई करणार अशी माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार सीटवर बसण्याच्या वादातून ही मारहाण झाल्याचे समोर आले होते. पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी स्थाकाजवळ ही घटना घडल्याचे समोर आले होते. या घटनेचा व्हिडीओ 6 ऑगस्टला सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांकडून तातडीने तपास सुरू करण्यात होता. आता 12 तासात या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.

मुंबई लोकलमधील प्रवासी असुरक्षित

एक महिन्यापूर्वी नालासोपारा ते चर्चगेट रेल्वेमध्ये बोरिवली येथे मयंक लोहार नावाच्या तरुणाची भर लोकलमध्ये सर्वांच्यासमोर चाकूने हत्या करण्यात आली होती. मयंक हा कुटुंबाचा एकूलता एक होता. मुसळधार पावसात लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून हा प्रकार घडला होता. हत्या केल्यानंतर आरोपी बोरिवलीला उतरून आरामात गेला होता. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून या आरोपीला अटक केली होती.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शरीरातील या 5 लक्षणांकडे बिलकूल दुर्लक्ष करु नका, तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला
  • महापौरांचं मारवाडी भाषेत स्वागत, मनसेचा संताप, भर कार्यक्रमात थेट… नेमकं काय घडलं?
  • सहा वर्षांपासून ओटीटीवर गाजतेय ही सीरिज; 3 सीझन्स, 33 एपिसोड्स अन् IMDb रेटिंगही तगडी
  • नकोच बाबा, त्याच्यासारखं मला अजिबात खेळायचं नाही… ऋषभ पंतबद्दल ध्रुव जुरेलने असं विधान का केलं?
  • Abhijeet Dipke : सीजेपीमध्ये मोठा उलटफेर, अभिजीत दीपकेंचा निर्णय काय? कुणाला दिली कोणती पदं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in