
बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री त्यांच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे सोशल मीडिया आणि इंडस्ट्रीमध्ये नेहमी चर्चेत असतात. पण 90 च्या दशकातील या अभिनेत्रीला तिच्या लुक, हेअरस्टाईल, मेकअप आणि ड्रेसिंगमुळे मोठी टीका सहन करावी लागली.
ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी 'प्रेम कैदी' या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीला तिच्या लूक, हेअरस्टाईल, मेकअप आणि ड्रेसिंग सेन्सवर टीका झाली, मात्र मेहनतीच्या जोरावर तिने स्वतःला सिद्ध केले.
यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आणि करिश्मा कपूर बॉक्स ऑफिसची आघाडीची अभिनेत्री बनली. विशेषतः गोविंदासोबतची तिची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
करिश्माला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. विशेष म्हणजे तिने केवळ पाचवीपर्यंत शिक्षण घेतले असले, तरी अभिनय आणि फॅशनच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ वर्चस्व गाजवले. 'दिल तो पागल है' या चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.
माध्यमांतील अहवालांनुसार, करिश्मा कपूर आज सुमारे 120 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण असून, ती आजही 90 च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.




Leave a Reply