• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लाडकी बहीण योजना बंद करणार? रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ; काय आहे ट्विट?

June 9, 2026 by admin Leave a Comment


पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत एक मोठा निर्णय घेण्यात आल्याने कोट्यवधी लाभार्थ्यांना धक्का बसला आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत एलपीजी सिलेंडरची वार्षिक मर्यादा 9 वरून आता डायरेक्ट 4 करण्यात आली आहे. यामुळे देशातील कोट्यवधी लाभार्थी हे नाराज झाले आहेत. पूर्वी 9 सिलेंडरवर सबसिडी देण्यात येत होती, मात्र आता ती संख्या फक्त 4 असेल. याच मुद्यावरून आता विरोधकांनीही सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात X ( पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट केली आहे. सरकारने उद्या उज्ज्वला योजनाच सरकारने गुंडाळली तर आश्चर्य वाटणार नाही, असाच प्रकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबीतही घडू शकतो, असा इशाराच एकप्रकारे रोहित पवार यांनी दिलं आहे. त्यांच्या या दाव्याने मोठी खळबळ माजली आहे.

रोहित पवार यांचं ट्विट काय ?

ट्विटरवर रोहित पवार यांनी केलेली पोस्ट काय ते जाणून घेऊया..

” उज्ज्वला योजनेतील अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या १२ वरुन आधी ९ केली आणि आता ९ वरुन थेट ४ करण्यात आली. उद्या ही उज्ज्वला योजनाच सरकारने गुंडाळली तर आश्चर्य वाटणार नाही. असाच प्रकार लाडक्या बहिणींच्या बाबतीतही सुरु आहे. निवडणुकीत मतांची बेगमी होताच सरसकट लाभ दिल्यानंतर आता वेगवेगळे निकष लावून ८० लाख लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढण्यात आलं. उद्या आणखी निकष लावून हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ दिला जाईल किंवा ही योजनाही अशीच बंद केली जाईल.” असं रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

” पुढील निवडणुकीत पुन्हा अशाच कुठल्यातरी योजनेचं तात्पुरतं गाजर दाखवलं जाईल. कारण मतांसाठी फसवणूक करणारं हे विश्वासघातकी सरकार आहे” असं टीकास्त्रही रोहितल पवार यांनी सरकारवर सोडत निशाणा साधला आहे.

 

उज्ज्वला योजनेतील अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या १२ वरुन आधी ९ केली आणि आता ९ वरुन थेट ४ करण्यात आली. उद्या ही उज्ज्वला योजनाच सरकारने गुंडाळली तर आश्चर्य वाटणार नाही. असाच प्रकार लाडक्या बहिणींच्या बाबतीतही सुरु आहे. निवडणुकीत मतांची बेगमी होताच सरसकट लाभ दिल्यानंतर आता वेगवेगळे… pic.twitter.com/lRGhe7TBZO

— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 9, 2026

बातमी अपडेट होत आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Indian Railway Refund Rules: ट्रेनमध्ये प्रवास केल्यानंतरही रिफंड मिळणार, काय आहे नियम…
  • लोहगडावर जाण्याचा आग्रह कुणाचा? सियाच्या आईचा खळबळजनक दावा काय?; व्हिडिओ कॉलवरूनच…
  • अयोध्येच्या राम मंदिरासाठी तुम्ही चांदीची विट दिली याला काय पुरावा आहे? नितेश राणेंचा ठाकरेंच्या सेनेला सवाल
  • केतन अग्रवाल मर्डर प्रकरण, सियाच्या भावावर पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती, 8 तासांपासून चौकशी
  • आम्ही तिघे भेटलो हीच… उद्धव ठाकरे-संजय राऊत यांच्यासोबत प्रवास करताना CM फडणवीसांचे मोठे विधान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in