• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लाज वाटली पाहिजे, 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 1 लाख घेऊन पंचायतीने सोडलं, 20 हजार रुपयांची दारु-चिकन पार्टी

July 13, 2026 by admin Leave a Comment


एक अत्यंत धक्कादायक, चीड आणणारं प्रकरण समोर आलं आहे. यांना माणसं म्हणायचं का? असा प्रश्न मनात निर्माण होतो. या घटनेने सगळ्या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. एका नराधमाने तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केला. माणुसकीला कलंकीत करणाऱ्या या प्रकरणात तात्काळ पोलीस कारवाई अपेक्षित होती. पण पोलिसांना कळवण्याऐवजी गावातचं पंचायत बसवण्यात आली. या पंचायतीने आरोपीवर एक लाख रुपयांचा दंड लावून गावातच हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. इतकचं नाही, आरोपीकडून लगेच 20 हजार रुपये घेतले. काहींनी त्या पैशातून दारु आणि चिकन पार्टी केली. गावातील एका व्यक्तीने या बद्दल पोलिसांना कळवल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं. माहिती मिळताच घाघरा पोलीस गावात आले. आरोपीला अटक केली. पीडितेच्या आईच्या जबानीच्या आधारावर FIR नोंदवली.

घाघरा पोलीस ठाणे क्षेत्रात येणाऱ्या पलमा गावची घटना आहे. पोलीस आता फक्त आरोपीच्या मागे लागलेले नाहीत, तर हे प्रकरण दाबणाऱ्यांची सुद्धा चौकशी करत आहेत. तीन वर्षाच्या मुलीसोबत झालेली गंभीर घटना गावच्या पंचायतीच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न होतोय अशी माहिती पोलिसांना मिळालेली असं घाघरा पोलीस ठाण्याचे प्रभारी मोहन कुमार यांनी सांगितलं. गावातील काही प्रभावशाली लोकांच्या दबावामुळे कुटुंब पोलिसात गेलं नाही. मिळालेली माहिती गांभीर्याने घेत पोलीस टीम लगेच गावात पोहोचली. पीडितेच्या आईची जबानी नोंदवून घेतली. त्या आधारावरच आरोपी सुनील लोहरा विरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. मुलांविरुद्ध लैंगिक गुन्हे गंभीर श्रेणीमध्ये मोडतात असं पोलिसांनी सांगितलं. अशा प्रकरणात कुठलीही तडजोड किंवा पंचायतीचा निर्णय म्हणजे कायदा होत नाही.

गावात एकच खळबळ उडाली

आरोपी सुनील लोहरा पीडित मुलीच्या घरी गेला. त्यावेळी मुलगी तिच्या आईसोबत होती. त्याने महिलेला सांगितलं की, तुम्ही तुमचं काम करा. मी मुलीला संभाळतो. काहीवेळाने तो मुलीला खोलीच्या आत घेऊन गेला. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून आई तिथे पोहोचली. मुलगी गंभीररित्या जखमी झालेली. त्यानंतर कुटुंबाने अत्याचाराची शंका व्यक्त केली व गावात एकच खळबळ उडाली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IND vs SL: भारतीय संघाचं काम सोप केलं, संधीचं सोनं केलं, तरीही रिकाम्या हाताने घरी जावं लागलं, पडिकलमुळे झाला ‘गेम’
  • प्रताप सरनाईकांचा निर्णय फिरवला, मराठी भाषेसंदर्भातील फडणवीसांच्या निर्णयावरून महायुतीत धुसफूस? घडलं काय?
  • पुण्याचे ४ जण नेपाळमध्ये अडकले, टूर्स कंपनीने सोडलं वाऱ्यावर; तरुणीने सांगितली नेपाळमधील विदारक परिस्थिती
  • Shweta Tiwari : छत्रपती संभाजीनगर ते मुंबई.. श्वेता तिवारीला शिवीगाळ करणाऱ्याला राज ठाकरेंच्या कार्यकर्तीने शोधलं, लिहून घेतला माफीनामा
  • Manoj Jarange: अंतरवालीत निर्णायक आंदोलन, सरकारचे शर्थीचे प्रयत्न, मनोज जरांगेंच्या मनधरणीला यश येणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in