• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लवकर बरा हो… अभिनेता राजेश शर्माच्या तब्ब्येतीबाबत अक्षय कुमार चिंतेत, विषारी किडा चावल्याने संसर्ग

July 9, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेता राजेश शर्मावर पश्चिम बंगालमधील ढाकुरिया येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रभासच्या फौजी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजेशला विषारी किडा चावल्याचे समोर आले आहे. यानंतर झालेला संसर्ग पायापासून गुडघ्यापर्यंत पसरल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असून सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता अभिनेता अक्षय कुमारने राजेशच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अक्षय कुमारची भावनिक पोस्ट

राजेश शर्माच्या प्रकृतीची माहिती मिळताच अक्षय कुमारने आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर केली. त्याने गोल्ड चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा राजेश यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले की, ‘माझ्या प्रिय मित्राला शूटिंगनंतर एका विषारी किड्याने चावा घेतला आणि त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. ही बातमी ऐकून मला खूप चिंता वाटली. भगवान महादेवांची कृपा त्याच्यावर राहो आणि तो लवकर पूर्णपणे बरा होवो.’ अक्षयने पुढे आपल्या पोस्टमध्ये भावनिक शब्दांत लिहिले की, लवकर बरा हो मित्रा… अजून आपल्याला एकत्र बसून खूप हसायचं आहे. अक्षयच्या या पोस्टनंतर चाहत्यांनीही राजेश शर्मा यांच्या लवकर प्रकृती सुधारण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Very concerned to hear about my dear friend Rajesh’s health condition after an insect bite while shooting. Hope Mahadev blesses him with fast and complete recovery. Jaldi theek ho ja yaar, abhi saath baith ke bhot hansna hai. pic.twitter.com/n8yH6IYxKH

— Akshay Kumar (@akshaykumar) July 9, 2026

AICWA ने उपस्थित केले गंभीर प्रश्न

राजेश शर्मा यांना हैदराबादमध्ये फौजी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान किड्याने चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन ने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संस्थेने म्हटले की, शूटिंग सेटवर तातडीच्या वैद्यकीय उपचारांची योग्य व्यवस्था होती का? जर शूटिंगदरम्यानच त्याची प्रकृती गंभीर झाली होती, तर त्याला हैदराबादमधील मोठ्या रुग्णालयात तातडीने का दाखल करण्यात आले नाही?

आता AICWA ने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असून, निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी भूमिका घेतली आहे. तसेच फौजी चित्रपटाच्या निर्मात्यांनी राजेश शर्मा यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलावा, अशीही मागणी संघटनेने केली आहे.

सध्या कशी आहे राजेश शर्माची प्रकृती?

लुधियाना येथे जन्मलेले 55 वर्षीय अभिनेते राजेश शर्मा सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. संसर्ग त्यांच्या गुडघ्यापर्यंत पसरल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबीयांच्या वतीने सुदीप चटर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश शर्मा यांना तीव्र ताप असून श्वास घेण्यासही त्रास होत आहे. संसर्ग वाढल्याने डॉक्टर विशेष उपचार करत आहेत. संसर्गामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका असून, त्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आयएमडीला ज्याची भीती होती शेवटी तेच घडणार; तब्बल 18 राज्यांवर महासंकट, महाराष्ट्राला सर्वात मोठा इशारा
  • नवी ईव्ही पॉलिसी आव्हानात्मक, पण भविष्यासाठी अत्यंत गरजेची; ऑटो डीलर्स संघटना ‘FADA’चे मोठे वक्तव्य
  • IND vs ENG: वैभव सूर्यवंशी सलग तिसऱ्या सामन्यात फेल, जोफ्रा आर्चरने पकडली कमकुवत बाजू
  • 5 लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये मारुतीचा धुमाकूळ! ‘या’ कारची विक्री वर्षभरात थेट दुप्पट; मिळते 33 किमीचे मायलेज
  • तुकाराम मुंढेंची चित्रपटसृष्टीत एन्ट्री, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाची मागणी, धाबे दणाणार; आता थेट शुटिंगच्यावेळीच…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in