• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लता मंगेशकरांचं हे गाणं बनलं अंगाई गीत, आईने म्हणताच मुलं पटकन झोपतात, 54 वर्षांपासून सुपरहिट

September 1, 2026 by admin Leave a Comment


सोशल मीडियावर सतत नवनवीन गाणी रिलीज होताना दिसत आहेत. मात्र, आजही काही चाहते 90 च्या दशकातील गाणी ऐकताना दिसतात. हिंदी चित्रपटसृष्टीत आई आणि मुलाच्या नात्याला नेहमीच अत्यंत भावनिक पद्धतीने पडद्यावर मांडण्यात आले आहे. जुन्या हिंदी चित्रपटांमधील अनेक अंगाई गीते आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यापैकीच एक हृदयस्पर्शी अंगाई म्हणजे ‘मेरा राजा बेटा बूझे एक पहेली’. 1972 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अनुराग’ चित्रपटातील हे गाणं आजही आईच्या मायेचे आणि मुलावरील तिच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते.

या गाण्यात नूतन आपल्या मुलाला कुशीत घेऊन झोपवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, मुलाला झोप येत नसते. तो आईला नेहमीची अंगाई म्हणण्याचा हट्ट करतो. त्यानंतर आई जेव्हा ‘प्यारी-प्यारी अखियों की कौन सहेली…’ असे शब्द गुणगुणते, तेव्हा संपूर्ण प्रसंगच भावूक करून जातो. नूतन यांच्या चेहऱ्यावरील भाव, अभिनयातील सहजता आणि आईच्या मायेचे दर्शन घडवणारी त्यांची शैली यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मनात कायमचे कोरले गेले.

तीन दिग्गजांमुळे गाणं झालं अजरामर

‘मेरा राजा बेटा बूझे एक पहेली’ या अंगाई गीताला अजरामर करण्यात तीन दिग्गजांचा मोठा वाटा आहे. गीतकार आनंद बक्षी यांच्या भावस्पर्शी शब्दांना एस. डी. बर्मन यांनी सुरेल संगीत दिले. तर लता मंगेशकर यांच्या आवाजाने या अंगाईला वेगळीच भावनिक उंची मिळाली.

लता मंगेशकर यांच्या आवाजातून हे शब्द ऐकताना जणू आई आपल्या लेकराला कुशीत घेऊन त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असल्याचा भास होतो. त्यामुळे अनेक दशकांनंतरही या गाण्याची जादू कायम आहे.

चित्रपटाची कथा भावनिक

‘अनुराग’ चित्रपटात नूतन यांनी अनु राय नावाच्या विधवा आईची भूमिका साकारली होती. त्यांचा मुलगा चंदन हा गंभीर आजाराने त्रस्त असतो. आपल्या मुलाच्या आजाराची गंभीरता आणि त्याच्यावर आलेले संकट आईला कळते.

मात्र, आई म्हणून आपल्या मुलाच्या चेहऱ्यावर दुःख दिसू नये, यासाठी नूतन स्वतःच्या वेदना मनात दडवतात आणि त्याला शांत करण्यासाठी ही अंगाई गातात. चित्रपटात हे गाणं दोन वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये येते. सुरुवातीला ते आनंदी वातावरणात ऐकायला मिळते तर नंतर मुलाच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्याचे दुःखद रूप अधिकच भावूक करून जाते.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बहिष्कार, समोर आलं मोठं कारण
  • खतरनाक सीरिज, एकदा सुरुवात केली तर शेवटपर्यंत बघतात लोक, प्रत्येक भाग सुपरहिट, फ्रीमध्ये बघत आहेत लोक
  • MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
  • देशी ब्रँडची युकेत धमाकेदार एण्ट्री, लाँच केला 5000mAh बॅटरी आणि 50MP सेल्फी कॅमेरा फोन
  • अभिजीत दीपकेंचा सर्वात मोठा विजय, सरन्यायाधीशांनी दाखवली पॉवर, सीजेपीची दुसरी मागणी मान्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in