
भारतातमध्ये लग्न म्हणजे एक मोठा सोहळा असतो. मुलगा आणि मुलीच्या आयुष्याची नवीन सुरुवात होण्यापूर्वी लग्नापूर्वीच्या विधी मोठ्या थाटात साजऱ्या केल्या जातात. तर लग्नानंतर सुखी संसाराचं स्वप्न दोघे देखील रंगवत असतात. लग्नानंतर मुलगी आई – वडिलांचं घर सोडते, तर फक्त नवऱ्याच्या भरवश्यावर… पण बदायूं जिल्ह्यातील उघैती पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रियोनाई गावात, लग्नाच्या आनंदाचं रूपांतर काही तासांतच किंकाळ्या आणि गोंधळात झालं. लग्नानंतर नवरदेव मुलगा बबलू मौर्या मोठ्या थाटात नवरी मुलीला त्याच्या घरी घेऊन आला. असं काही घडलं ज्यामुळे लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्याचं निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, साप चावल्यामुळे बबलू याने अखेरचा श्वास घेतला, लग्नानंतर ज्या घरात आनंदाचं वातावरण होतं, त्या घरावर एका रात्रीत दुःखाचा डोंगर कोसळला. तर नववधू बांगड्या तोडून रडू लागली.
रिओनाई गावातील रहिवासी असलेल्या बबलू मौर्य याची वरात गुन्नौर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लौहारपुरा गावात गेली होती. गुरुवारी दुपारी, नववधू रश्मीची पाठवणी झाल्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईक घरी परतले; त्यानंतरचा दिवस नवीन सुनेच्या स्वागतासाठी आयोजित विविध विधी आणि आनंदोत्सवात गेला. परंपरेनुसार, सर्वकाही पार पडलं… अशात रात्री झोपताना बबलू यांच्या मानेला साप चावला.
सकाळी उठल्यानंतर बबलू याची प्रकृती गंभीर झाली आणि नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली. प्रकृती गंभीर असल्याचं कळताच, बबलू याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी बबलू याला मृत घोषित केलं… डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, बबलू याला सापाने चावलं आहे. बबलू याचं निधन झाल्याचं कळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला…
डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर देखील नातेवाईकांनी बबलू याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केलं. जेथे डॉक्टरांनी पुन्हा बबलूची तपासणी केली आणि मृत घोषित केलं. अशात नातेवाईकांनी डॉक्टरांचं काहीच ऐकलं नाही आणि पोस्टमार्टम करण्यास देखील नकार देला. बबलू पुन्ही जिवंत होईल याच आशेने कुटुंबियांनी त्याला मांत्रिकाकडे नेलं आणि गारुड्याकडे देखील नेलं. संध्याकाळपर्यंत त्यांच्यावर मंत्र जपण्यात आले… पण काहीही झालं नाही.
Leave a Reply