• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं…रोहित पवार यांचा घणाघाती हल्ला

June 17, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना शिंदे गटात ठाकरे गटाचे 6 खासदार दाखल होणार आहेत. त्यांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजूरीही दिली. काल रात्रीच ही प्रक्रिया पार पडली. एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा लोकसभा अध्यक्षांची भेट राजस्थानमध्ये घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे महत्वाचे नेतेही दिल्लीत आहेत. शिवसेना ठाकरे गटातून तब्बल 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जात असल्याने हा मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना म्हणावा लागेल. शिवसेना ठाकरे गटाकडून खासदारांना व्हिप जारी करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. काल चार्टर विमानाने या खासदारांना दिल्लीत नेण्यात आले. राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आल्याचे बघायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंच्या गटाकडून गंभीर आरोप केले जात आहेत.

यादरम्यानच आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत गंभीर आरोप केला. रोहित पवार यांनी म्हटले की, लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं… हा अत्यंत किळसवाणा राजकीय व्यभिचार असून संविधान व लोकशाही मोडून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु असल्याचं हे लक्षण आहे. याला ‘ऑपरेशन टायगर’ नाही ऑपरेशन बाजार’ म्हणावं लागेल आणि हा ऑपरेशन बाजार लायकीचा, माणसांचा की विचारांचा हे लोकंच ठरवतील.

एकेका खासदाराचा रेट 85 कोटी..??? एवढे पैसे द्यायला संबंधित पक्षाकडं पैसे येतात तरी कुठून? शिवसेना, राष्ट्रवादी, आप, तृणमूल काँग्रेस आणि आता पुन्हा शिवसेना.. देशात हे असंच सुरू राहिलं तर एक दिवस लोकंच रस्त्यावर उतरून पळून जाणाऱ्यांना आणि पळवून नेणाऱ्यांना चोपल्याशिवाय राहणार नाहीत.

लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं… हा अत्यंत किळसवाणा राजकीय व्यभिचार असून संविधान व लोकशाही मोडून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु असल्याचं हे लक्षण आहे. याला ‘ऑपरेशन टायगर’ नाही ‘ऑपरेशन बाजार’ म्हणावं लागेल आणि हा ‘ऑपरेशन बाजार’ लायकीचा, माणसांचा की विचारांचा हे…

— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 17, 2026

आज डोक्यावर दुष्काळाचं सावट आहे, पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी नाही, मालाला भाव नाही, बेरोजगारी वाढलीय, नोकरभरतीचा बट्ट्याबोळ केलाय, मध्यमवर्गीयांना ईएमआय भरण्यासाठी पैसे नाहीत आणि अशा परिस्थितीत सामान्य माणूस कधी नाही एवढा अडचणीत असताना यावर मात्र चर्चा होत नाही, हे दुर्दैव आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in