• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धो डाला… पाणी तुंबले, वाहतूक कोंडी, घराघरात पाणी, पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण

June 24, 2026 by admin Leave a Comment


मॉन्सून राज्यभरात दाखल झाला. पहिल्याच दिवसात तीनतेरा वाजले आहेत. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने रस्ते जलमय झाले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. दादरच्या परिसरात झाड गाडीवर पडल्याने नुकसान झाले. कुर्ला, सायन सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. धरण क्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. पाणीटंचाईचे मोठे संकट होते. अंधेरी सबवे बंद आहे. कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता थेट लोकांच्या घरापर्यंत पोहोचला आहे. कांदिवली पूर्व हनुमान नगर येथील राधा कृष्ण सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याचे समोर आले आहे.

राधा कृष्ण सोसायटीतील रहिवाशांच्या घरात रात्री पाणी शिरले. त्यामुळे या सोसायटीतील लोकांनी रात्रभर घरातील पाणी बाहेर काढण्याचे काम केले. सध्या पावसाचा जोर कमी झाला असून हलक्या सरी सुरू आहेत. आता घरांमधील पाणी ओसरले आहे. मात्र पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास परिस्थिती बिघडण्याची भीती रहिवासी व्यक्त करत आहेत.

पुढील 3 तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दादर, माटूंगा, अंधेरी, कुर्ला, सायन या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. फक्त मुंबई आणि उपनगरेच नाही तर राज्यभरात हीच स्थिती आहे. पुण्यातही मुसळधार पाऊस आहे. मोठा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला.

अकोला जिल्ह्यातल्या अकोट शहरात मुसळधार पावसाचा फटका, अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून पाणी काढत रात्र जागून काढावी लागली आहे. तर रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. खामगाव, शेगाव, संग्रामपूर सह इतर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.. नेमका हा पाऊस पेरणी करता कसा दिलासादायक ठरतो याकडे देखील बळीराजा लक्ष ठेवून आहे. .



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘ लग्न करायचं नव्हतं तर नकार द्यायचा, माझ्या लेकाला का मारलं..?’ केतन अग्रवालच्या पालकांचा आक्रोश, केली मोठी मागणी
  • CM Fadnavis | मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन मागे; 3 दिवसांच्या आंदोलनानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार, नेमकं काय घडलं?
  • Eetha : तमाशा फडातच प्रसूती, दगडाने ठेचली नाळ; कोण होत्या विठाबाई नारायणगावकर?
  • विलास घुले हत्याकांडात खासदार बजरंग सोनवणेंच्या पुत्राला अटक?, मृत्यूआधी सगळे सांगितले, थेट देवेंद्र फडवीस यांनी..
  • Rule Changes From 1st July: LPG सिलिंडर, रेल्वे तिकीट…1 जुलैपासून कोणते नियम बदलणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in