• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड; पाहा व्हिडीओ

July 21, 2026 by admin Leave a Comment


देशातील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासोबत समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर राहुल गांधी यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यामुळे प्रचंड गर्दी जमली होती. वातावरण तापलं होतं. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. राहुल गांधी यांनाही ताब्यात घेतलं. राहुल गांधी यांना ताब्यात घेताना प्रचंड गोंधळ झाला. राहुल गांधी खाली पडले. त्यांना उचलण्यासाठी पोलीस धडपड करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर तीन ते चार तासापासून राहुल गांधी यांनी ठिय्या आंदोलन केलं. तसेच त्यांनी ट्विट करून देशातील नागरिकांना या ठिय्या आंदोलनात येण्याचं आवाहन केलं. त्यामुळे पोलीस अलर्ट झाले. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनेकांची धरपकड केली. राहुल गांधी यांनाही ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले. यावेळी राहुल गांधी यांनी नकार दिला. राहुल गांधी जमिनीवर झोपले. त्यामुळे त्यांना उचलण्यासाठी पोलीस धडपड करत होते. राहुल गांधी यांनी दोन्ही हात छातीला लावले. एका पायाचा जमिनीवर जोर दिला. त्यामुळे त्यांना ताब्यात घेणे पोलिसांना कठिण गेले. राहुल गांधींचे अंगरक्षक एकीकडे पोलिसांना हटवत होते. तर दुसरीकडे पोलीस राहुल गांधींना उचलण्यासाठी प्रयत्न करत होते. काँग्रेसने हा व्हिडीओ त्यांच्या अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्यात हे दृश्य दिसत आहे.

काँग्रेसने ट्विट केला व्हिडीओ

काँग्रेसने हा व्हिडीओ ट्विट करून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पाहा मोदींची हुकूमशाही. देशातील विरोधी पक्षाच्या नेत्याला अशा पद्धतीने वागवलं जात आहे. लज्जास्पद… असं ट्विट काँग्रेसने केलं आहे. काँग्रेसने सोबत व्हिडीओही ट्विट केला आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

 

मोदी की तानाशाही देखिए।

देश के नेता विपक्ष के साथ ऐसा सुलूक किया जा रहा है।

शर्मनाक! pic.twitter.com/mPvojsUnbA

— Congress (@INCIndia) July 21, 2026

नेत्यांची रिघ

दरम्यान, कालच्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. अनेक तरुणांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे तरुण जखमी झाले. अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक तरुणांची धरपकड करण्यात आली. त्यामुळे वातावरण अधिकच तापले. या आंदोलनाचे पडसाद आजही उमटले.

कालच्या आंदोलन चिघळल्यानंतर आज अनेक पक्षाच्या नेत्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी होऊन त्यांना पाठिंबा दिला. ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दीपके यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. अखिलेश यादवही आंदोलन स्थळी आले. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही जोरदार निदर्शने केली. पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. यावेळी त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. पोलिसांनी अखिलेश यादव यांनाही ताब्यात घेतलं.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in