• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राहुल गांधींचा पाय खोलात, अमित शाहांविरोधातील ते भाषण नडले, संसदेतून थेट नोटिस जारी

August 14, 2026 by admin Leave a Comment


लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने भाजपाचे खासदार अनुराग ठाकुर यांच्या तक्रारीवर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना नोटिस जारी केली आहे. राहुल गांधी यांच्याकडे २८ ऑगस्ट २०२६ पर्यंत या नोटिसीवर उत्तर मागण्यात आले आहे. एंटी पेपर लिक विधेयकावर चर्चेला उत्तर देताना असंसदीय आणि अपमानजनक भाषेचा वापर आणि गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप लावण्याचा आरोप केला आहे.

लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने सभागृहात ‘इडियट’ आणि ‘अंधभक्त’ सारख्या शब्दाचा वापर केल्यामुळे राहुल गांधी यांना नोटीस जारी केली आहे. यात त्यांना २८ ऑगस्ट २०२६ पर्यंत उत्तर मागण्यात आले आहे. ही नोटीस भाजपाचे खासदार अनुराग ठाकुर यांच्यावतीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलेल्या तक्रारीच्या आधारवर जारी करण्यात आली आहे.

अनुराग ठाकुर यांनी ३० जुलै २०२६ रोजी राहुल गांधी यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली होती. या तक्रारीत त्यांनी राहुल गांधी यांनी एंटी पेपर लिक विधेयकावर लोकसभेत चर्चा दरम्यान राहुल गांधी यांनी असंसदीय आणि अपमानजनक भाषेचा वापर केला होता. तसेच केंद्रीय गृहमंत्र्याच्या विरोधात राहुल गांधी यांनी गंभीर आरोपही केले होते. मात्र, सभगृहाच्या नियमानुसार ३५३ अंतर्गत यासाठी पुरेशी पूर्व सूचना दिलेली नव्हती.

राहुल गांधी यांनी २८ ऑगस्टपर्यंत उत्तर द्यावे

विशेषाधिकार समितीच्या वतीने जारी नोटीसीत राहुल गांधी यांना त्यांच्यावर केलेल्या आरोपावर उत्तर देण्यासाठी २८ ऑगस्ट पर्यंत मुदत दिली आहे. या प्रकरणात भाजपाचे खासदार डॉ. संजय जायसवाल यांच्या वतीने २९ जुलै २०२६ रोजी लोकसभेत तक्रार दिली होती. यात राहुल गांधीवर गृहमंत्र्या विरोधात कथितपणे असंसदीय शब्दांचा वापर करण्याचा आरोप लावण्यात आला आहे.

संजय जयस्वाल यांनी या प्रकरणाची दखल घेऊन लोकसभेच्या कामकाजाची कार्यपद्धती आणि संचालनासंबंधीच्या नियमांनुसार योग्य ती कारवाई सुरू करण्याची विनंती केली होती.

पेपर लिक बिलावर चर्चे दरम्यान झाला होता वाद

हा संपूर्ण वाद मान्सून सत्रात एंटी पेपर लिक विधेयकावर लोकसभेत झालेल्या चर्चेशी संबंधित आहे. राहुल गांधी यांनी संसदेत गोंधळात भाषण केले त्यांनी काही विद्यार्थ्यांशी खासकरुन तरुणांशी झालेली चर्चा आपण मांडणार असल्याचे म्हटले होते.

राहुल गांधी म्हणाले की स्टुडन्ट तो असतो ज्याचे मन आणि हृदय खुले असते. त्यानंतर त्यांनी अशा लोकांच्या दुसऱ्या श्रेणाचा उल्लेख केला आणि म्हटले की त्यांना वाटते की सर्व काही जाणतात आणि ज्ञान त्यांच्या आतून येते.

राहुल यांच्या मते त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले की ते अशा लोकांना काय म्हणतात. विद्यार्थीनीनी मला सांगितले की ते त्यांना इडिएट म्हणतात.

‘इडियट’ आणि ‘अंधभक्त’ शब्दामुळे गोंधळ

यानंतर राहुल यांनी तिसऱ्या श्रेणाचा उल्लेख करत ‘अंधभक्त’शब्दाचा उल्लेख केला. ते म्हणाले होते की विद्यार्थींनींच्या मते ‘अंधभक्त’ तोच व्यक्ती असतो ज्याला विश्वास असतो की ‘इडियट’ च भगवान आहे, राहुल गांधी यांनी या भाषणात तीन श्रेणी सांगत म्हटले होते की ‘स्टूडन्ट, इडियट आणि अंधभक्त’

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी खासदारांनी जोरदार आक्षेप व्यक्त केला आणि सभागृहात हंगामा झाला. राहुल गांधी यांनी तेव्हा स्पष्ट केले की ते कोणत्याही सत्ता पक्षाच्या सदस्यांना व्यक्तिगत रुपाने ‘इडिएट’ म्हणत नाहीएत, तर विद्यार्थींनीशी झालेल्या चर्चेचे उदाहरण देत आहेत.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in