• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘रामायण’च्या ट्रेलरनंतर कंगना रणौतने शेअर केला सीतेचा फोटो; म्हणाली-‘ही सीता आवडली का?’

July 31, 2026 by admin Leave a Comment


‘रामायण’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर या चित्रपटाची प्रचंड जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटातील कलाकार, भव्य सीन, VFX आणि प्रत्येक पात्राच्या सादरीकरणाची सर्वत्र कौतुक होत आहे. विशेषतः अभिनेत्री साई पल्लवीने साकारलेल्या सीतेच्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले असून काहींनी तिची तुलना रामानंद सागर यांच्या लोकप्रिय ‘रामायण’ मालिकेतील सीतेशीही केली आहे.

दरम्यान, अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत हिनेही या चर्चेत सहभागी होत आपल्या बालपणीचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या या फोटोत कंगना रणौत शालेय कार्यक्रमात सीतेच्या वेशात दिसत आहे. तिच्यासोबत राम आणि हनुमानाच्या भूमिकेत तिचे वर्गमित्रही दिसत आहेत.

कंगनाने शेअर केला जुना फोटो

या फोटोसोबत कंगनाने आपल्या सहकलाकारांची नावेही नमूद केली आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, राम – चंद्रेश कुमारी, हनुमानजी – पारुल मोदगिल, 1997 बॅच, हिल व्ह्यू पब्लिक स्कूल (सरकाघाट), जिल्हा मंडी. या पोस्टमुळे कंगनाच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला असून चाहत्यांनीही या फोटोवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यानंतर कंगनाने आणखी एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली असून त्यामध्ये सीतेच्या वेशातील तिचा क्लोज-अप फोटो पोस्ट केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ट्रेलरनंतर रामायण चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता

दुसरीकडे, सुमारे 4,000 कोटी रुपयांच्या भव्य बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या ‘रामायणम्’ चित्रपटाने ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढवल्या आहेत. चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असून बॉक्स ऑफिसवर तो किती मोठा विक्रम प्रस्थापित करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Latest and Breaking News on NDTV

रामायणाची कथा भारतीयांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. त्यामुळे या नव्या चित्रपटातून राम, सीता आणि इतर पात्रांचे सादरीकरण प्रेक्षकांच्या अपेक्षांवर कितपत खरे उतरते, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र ट्रेलरनंतर निर्माण झालेली उत्सुकता पाहता ‘रामायणम्’ हा यंदाच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तीन नवजात बालकांचा मृत्यू, आमदार रवी राणा यांचा डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप..
  • 86 हजार 622 कोटींचं बिल थकीत, कंत्राटदार आर्थिक अडचणीत; शिवतीर्थावर घेणार राज ठाकरेंची भेट
  • IND vs SL: यशस्वी जयस्वालचा माज खपवून घेतला जाणार नाही, भारतीय कोचकडून थेट वॉर्निंग
  • Drishyam 3: विजय साळगावकरचा शेवटचा डाव, अजय देवगणचा ‘दृश्यम: द कन्क्लुजन’; दोन भागांनी वाढवलेलं गूढ आता संपणार
  • शारीरिक संबंधांसाठी प्रेयसीला घेऊन गेला जंगलात, कपडे काढताच… प्रकरण समोर येताच पोलिसही हादरले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in