• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राज्यातील या बड्या बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची नोटीस, मोठी खळबळ, तुमचंही खातं आहे का?

June 28, 2026 by admin Leave a Comment


मोठी बातमी समोर येत आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. आरबीआयकडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सहकार कलमातंर्गत  35 अ आणि 47 अ अन्वेय ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार   जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून चुकीच्या पद्धतीने संचालकांना देण्यात आलेलं कर्ज आणि कर्जमाफी तसेच गैरकारभारामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला ही नोटीस बजावण्यात आली आहे.

गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल 

दरम्यान सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नोटीस पाठवण्यात आल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. चुकीच्या पध्दतीने जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली बँकेचा कारभार सुरू आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक आणला पाहिजे, त्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. सध्या सुरू असलेली, नोकर भरती बोगसगिरी पद्धतीने सुरू आहे.  आरबीआयची नोटीस आणि नोकर भरतीचा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे. लवकरच याचे परिणाम दिसतील, असं यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

संचालक मंडळाची चिंता वाढली

दरम्यान सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. आरबीआयकडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून चुकीच्या पद्धतीने संचालकांना देण्यात आलेलं कर्ज आणि कर्जमाफी तसेच गैरकारभारामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता संचालक मंडळाची चिंता वाढण्याची शक्यता आहे. या नोटीसवरून आमदार पडळकर यांनी संचालक मंडळावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी बँकेत प्रशासकाच्या नियुक्तीची मागणी केली आहे.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्…अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक, त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
  • मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर…
  • आयफोन 17 प्रचंड स्वस्त होणार? की सगळ्यांचीच घोर निराशा; आयफोन 18 लॉन्च होताच मोठा धक्का बसणार?
  • उंदीर मारण्याचे एक ग्रॅम औषध टाकून आरोपी काय करणार होता? भायखळा मोहरम केसचा तपास सुरु
  • राज्यातील या बड्या बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची नोटीस, मोठी खळबळ, तुमचंही खातं आहे का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in