• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राज्याच्या राजकारणात खळबळ! भाजप नेत्याने तडकाफडकी पक्ष सोडला, राजीनामा पत्रात काय?

July 26, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात मोठे बदल पहायला मिळाले आहेत. दिल्लीत नीट पेपरफुटीप्रकरणी आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण खात्याच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या आंदोलनात लाठीचार्जदेखील झाला होता. त्यामुळे केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली जात आहे. अशातच आता या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज्यातील भाजपच्या एका नेत्याने तडकाफडकी राजीनामा दिला आहे. हा नेता कोण आहे त्याच्याकडे काय पद होतं? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अमळनेरच्या शहराध्यक्षांचा राजीनामा

जळगावच्या अमळनेर येथील भाजप शहराध्यक्ष तथा नगरपरिषदचे माजी सभापती श्याम जयवंतराव पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन हिंसेने दडपण्याचा प्रयत्न तसेच भाजपाचे विद्यमान धोरण यामुळे व्यथित आणि दुःखी झाल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. पाटील यांचा राजीनामा हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

राजीनाम्याचे कारण काय?

श्याम पाटील यांनी राजीनाम्याचे पत्र भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती समोर आली आहे. भाजपमधील विद्यमान सर्व पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं श्याम पाटील यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे. माझ्यासाठी पद प्रतिष्ठा महत्त्वाचे नसून विद्यार्थी, शेतकरी यांच्यासह सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे हित महत्वाचे आहे. मी लवकरच राजकारणातील पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहितीही श्याम पाटील यांनी म्हटले आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन मागे

नीट पेपरफुटीप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य झाल्यानंतर आता आंदोलन मागे घेण्यात आले आहे. असं असलं तरी आगामी काळात पुन्हा रस्त्यावर उतरू असा इशारा कॉकरोच जनता पार्टीकडून देण्यात आला आहे. ही पार्टी आता देशातील विविध भागात जाऊन तेथील मुद्यांसाठीही लढा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या पार्टीच्या आगामी आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
  • वैभव सूर्यवंशीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला पाहिजे…थेट BCCI अन् ICC कडे केली तक्रार, असं का?
  • इस्लामची पुस्तके वाचा, नाहीतर मुलाला दहशतवाद्यांना विकून टाकेन… तिघांच्या मृत्यूनंतर कोचचे काळे कृत्य उघड
  • Sugar price hike : मोठा निर्णय! 5 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही, डी मार्ट, बिगबास्केट आणि ब्लिंकिट… कंपन्यांनी बंदी का घातली?
  • कंत्राटदार संघटनेचा सरकारला मोठा इशारा, मुंबईतील कंत्राटदाराने वैतागून संपवली जीवनयात्रा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in