• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18…

July 1, 2026 by admin Leave a Comment


कल्याण-डोंबिवली परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासांत शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कल्याण आणि डोंबिवली भागात 18 हून अधिक झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडे हटवण्याचे काम सुरू केले. यामध्ये काही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, काल चेंबूर येथे झाड कोसळ्यामुळे घडलेल्या बस अपघातात एका चिमुकल्याने जीव गमावला होता तर अनेक जखमी झाले होते. त्यामुळे शासन सर्व ठिकाणी झाडांचे सर्वेक्षण करत आहे.

दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांत आणखी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे महापालिकेने आपत्कालीन पथके सज्ज ठेवली आहेत. पावसामुळे काही भागांत पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यातील काही भगांना रेड, तर काहींना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kangana Ranaut: समन्स आलं अन् होणारे सासू-सासरेच पळाले..; लग्नाबाबत कंगनाने सांगितला धक्कादायक किस्सा
  • 107 स्टोरी, 7,891 फॉलोअर्स; आता संगीता चांदगुडे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटची चर्चा, अनेक पोस्ट एकाच विषयावर
  • तीन नवजात बालकांचा मृत्यू, आमदार रवी राणा यांचा डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप..
  • 86 हजार 622 कोटींचं बिल थकीत, कंत्राटदार आर्थिक अडचणीत; शिवतीर्थावर घेणार राज ठाकरेंची भेट
  • IND vs SL: यशस्वी जयस्वालचा माज खपवून घेतला जाणार नाही, भारतीय कोचकडून थेट वॉर्निंग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in