• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर, सीमेवर प्रचंड तणाव, पाकिस्तान लष्कराच्या हवाई..

July 1, 2026 by admin Leave a Comment


मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणाव प्रचंड वाढला. सतत एकमेकांवर मोठे हल्ले केले जात आहेत. पाकिस्तानने मोठा हवाई गल्ला अफगाणिस्तानवर केला होता. त्यात अनेक अफगाणिस्तान नागरिकांना जीव गमवावा लागला. काल रात्री उशिरा 30 जून रोजी अफगाण सैन्याने हवाई हल्ले करण्यासाठी पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांच्या हद्दीत प्रवेश केला. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने या कारवाईला दुजोरा दिला. पुन्हा एकदा या दोन्ही देशात तणाव वाढला आहे. इस्लामिक स्टेटची उपशाखा असलेल्या इस्लामिक स्टेट-खोरासानच्या तळांना टार्गेट करण्यात आल्याचा दावा केला आहे. दोन्ही देशात तणाव वाढला आहे. पाकिस्तान वेगवेगळ्या पद्धतीने अफगाणिस्तानवर हल्ले करताना दिसत आहे.

पाकिस्तानने सोमवारी 29 जूनच्या मध्यरात्री अफगाणिस्तानमधील 3 प्रांतांमध्ये हवाई हल्ले केले. तालिबान राजवटीनुसार, या हल्ल्यांमध्ये 36 नागरिक मारले गेले. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आता अफगाणिस्तानने हल्ला केला.  अफगाणिस्तानने 30 जूनच्या रात्री उशिरा पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांवर हवाई हल्ले केले.

अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात स्पष्ट केले की, बलुचिस्तानमधील पिशिन जिल्ह्यातील सरनान बाजार भागात अफगाण लष्कराच्या ड्रोन हल्ल्याचे लक्ष्य ठरलेली इमारत ही इस्लामिक स्टेट खोरासान या जागतिक दहशतवादी संघटनेची होती. पाकिस्तानमधून समोर आलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यात टार्गेट करण्यात आलेली इमारत प्रत्यक्षात एक शाळा होती जिथे अफगाण लष्कराचे माजी सैनिक राहत होते.

या हल्ल्यात त्यापैकी तीन सैनिक जखमी झाले. तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर हे माजी सैनिक अहमद मसूद ज्युनियर यांच्या ‘नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट’मध्ये (NRF) सामील झाले होते. दोन्ही देश हल्ले करत आहेत. अफगाणिस्तान आणि भारताचे नाते चांगले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने केलेल्या मोठ्या हवाई हल्ल्यानंतर भारताने अफगाणिस्तानला मदतीचा हात देत आैषध गोळ्या पाठवल्या होत्या. यादरम्यान पाकिस्तानने भारतावर जोरदार टीकाही केली होती.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 107 स्टोरी, 7,891 फॉलोअर्स; आता संगीता चांदगुडे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटची चर्चा, अनेक पोस्ट एकाच विषयावर
  • तीन नवजात बालकांचा मृत्यू, आमदार रवी राणा यांचा डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप..
  • 86 हजार 622 कोटींचं बिल थकीत, कंत्राटदार आर्थिक अडचणीत; शिवतीर्थावर घेणार राज ठाकरेंची भेट
  • IND vs SL: यशस्वी जयस्वालचा माज खपवून घेतला जाणार नाही, भारतीय कोचकडून थेट वॉर्निंग
  • Drishyam 3: विजय साळगावकरचा शेवटचा डाव, अजय देवगणचा ‘दृश्यम: द कन्क्लुजन’; दोन भागांनी वाढवलेलं गूढ आता संपणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in