• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, घडामोडींना वेग

June 26, 2026 by admin Leave a Comment


राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.  शिवसेना ठाकरे गटाला नुकताच मोठा धक्का बसला आहे. पक्षातील 9 खासदारांपैकी तब्बल 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. या सर्व खासदारांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान यावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे, मात्र त्याचवेळी भाजपावर ठाकरे गटाकडून टीका करणं टाळलं जात असल्याचं देखील दिसून येत आहे. याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानाने प्रवास केल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईहून नागपूरला रवाना होणाऱ्या विमानात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून प्रवास केला आहे.  यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना हस्तादोंलन देखील केलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in