• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रागामुळे तुमचं होतंय मोठं नुकसान? अचार्य चाणक्या यांनी सांगितलेल्या या तत्त्वांचे पालक करा, ज्यामुळे बदले जीवन

August 4, 2026 by admin Leave a Comment


राग हा माणसाचा शत्रू आहे… असं कायम सांगितलं जात. पण वरिष्ठ कायम तरुणांना सांगत असतात की, रागावर आपलं नियंत्रण असायला हवं आणि ते गरजेचं देखील आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुणांच्या डोक्यात अनेक विचार सुरु असतात. कामाचा ताण, कुटुंबाची जबाबदारी.. अशा अनेक जबाबदाऱ्या तरुणांवर असतात. अशात राग येणं स्वभाविक आहे,  पण असं असलं तरी रागावर नियंत्रण हवा… अचार्य चाणक्य देखील सांगतात की, क्रोध करु नये… आजच्या तरुणांना चाणक्याच्या नीतिमूल्यांबद्दल सांगण्याची गरज नाही. लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत, अनेकांना त्यांनी सांगितलेल्या गोष्टी जाणून घेण्यात रस आहे. तुम्हाला अति रागाचा त्रास होतो का? जर तुम्ही चाणक्याने सांगितलेल्या या गोष्टींचे पालन केले, तर तुमचे आयुष्य बदलेल.

राग कमी करण्यासाठी चाणक्याने सांगितलेल्या काही गोष्टी येथे दिल्या आहेत. जेव्हा तुम्हाला खूप राग येतो, तेव्हा तुमचं मन शांत ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तसेच, राग आल्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी, तुम्ही काही काळ शांत राहिलं पाहिजे. त्याचबरोबर, त्या वेळी तुम्ही स्वतःला त्या परिस्थितीपासून दूर ठेवणं अधिक चांगले आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शब्दांवरही तुमचं नियंत्रण असलं पाहिजे. कारण रागाच्या भरात बोललेले शब्द मागे घेता येत नाहीत. त्यामुळे, बोलण्यापूर्वी विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही समस्येवरही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यावेळी, समोरच्या व्यक्तीला अजिबात दोष देऊ नका. तसेच, समस्येचे कारणही जाणून घ्या.

तुम्ही तुमच्या रागाचे शक्तीत रूपांतर करून त्याचा उपयोग तुमच्या विजयासाठी केला पाहिजे. जर तुम्ही मेहनती असाल, तर तुम्ही तुमच्या रागाचं शक्तीत रूपांतर केलं पाहिजे. तुम्ही शांत असतानाच कोणताही निर्णय घ्यावा. कधीकधी तो चुकीचा ठरू शकतो. म्हणून, आपले मन शांत ठेवा.तुम्हाला कितीही राग आला तरी, त्याचा राग इतरांवर काढू नका. त्या वेळी तुम्हाला शांततेची गरज असते.

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

 

 

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai FDA : शिवाजी पार्कातील कॅफे कॅडेलचा अन्न परवाना रद्द; एफडीएकडून कारवाई
  • लॉन्च होताच ‘निसान’च्या ‘या’ नव्या एसयूव्हीचा धुमाकूळ; पहिल्याच महिन्यात क्रेटा आणि डस्टरचे टेन्शन वाढवले
  • PPF मध्ये 1000,5000 किंवा 10000 रुपये जमा केल्यावर किती परतावा मिळेल? कॅल्क्युलेशन जाणून घ्या
  • मुंबई पालिका आयुक्तांनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकारली, वंचितचा आरोप; माफीची मागणी!
  • तुमच्या हृदयासाठी कोणते तेल चांगले?, या 5 तेलांचा वापर ठरेल फायदेशीर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in