• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

योगदिनानिमित्त करा ‘हे’ 5 सर्वोत्तम योगासने, वजन कमी होण्यास होईल मदत

June 20, 2026 by admin Leave a Comment


आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना वाढत्या वजनाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात वजन वाढणे ही केवळ दिसण्यापुरती समस्या राहिलेली नाही. तर त्यामुळे अनेक आरोग्य समस्याही निर्माण होऊ लागल्या आहेत. जास्तवेळ एकाच जागी बसून काम करणे, अनियमित खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे लठ्ठपणा झपाट्याने वाढत आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक जिम, डाएट आणि इतर पद्धतींचा अवलंब करतात. तथापि तुम्ही जर शरीर आणि मन या दोन्हींसाठी फायदेशीर ठरेल अशा पद्धतीच्या शोधात असाल, तर योगा करणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

योगामुळे केवळ लवचिकताच सुधारत नाही, तर स्नायू मजबूत होण्यास, तणाव कमी होण्यास आणि शरीरातील ऊर्जेचा समतोल राखण्यासही मदत होते. दररोज योगाभ्यास आणि संतुलित आहार वजन कमी करण्यास मदत करू शकतात. वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम योगासने कोणती आहेत आणि कोणत्या योगासनांचा सराव करावा हे जाणून घेऊयात.

1. सूर्य नमस्कार

वजन कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार हे सर्वात उत्तम योगासन आहे. कारण सूर्यनमस्कार करताना यामध्ये अनेक आसनांचा समावेश असतो, ज्यामुळे संपूर्ण शरीर सक्रिय होते. नियमितपणे सूर्यनमस्कार केल्याने कॅलरी बर्न होण्यास आणि शरीर सुडौल होण्यास मदत होते.

2. नौकासन

नौकासनामुळे पोटाचे आणि कमरेचे स्नायू बळकट होतात. या आसनामध्ये शरीर होडीसारखी स्थिती तयार होते. हे आसन पोटाचे स्नायू मजबूत करते आणि पोटावरील फॅट कमी करण्यास मदत करू शकते.

3. भुजंगासन

भुजंगासन पाठीचा कणा मजबूत करते आणि पोट व कंबरेच्या भागांना सक्रिय करते. हे आसन लवचिकता वाढवण्यासाठी फायदेशीर मानले जाते आणि तुमच्या नियमित योगाभ्यासात याचा समावेश करणे चांगले आहे.

4. धनुरासन
धनुरासन (Dhanurasana) मध्ये शरीर धनुष्यासारखे स्थित केले जाते. या आसनामुळे पोटाचे, मांड्यांचे आणि पाठीचे स्नायू बळकट होतात. तुमच्या व्यायामाच्या नित्यक्रमात याचा समावेश केल्यास तुम्हाला अधिक उत्साही वाटण्यास मदत होऊ शकते.

5. उत्कटासन

उत्कटासन, ज्याला चेअर पोझ असेही म्हणतात, पाय, मांड्या आणि पोटाचे स्नायू मजबूत करण्यास मदत करते. नियमित सरावाने शारीरिक ताकद आणि संतुलन सुधारू शकते.

तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल, तर संतुलित आहार, पुरेशी झोप आणि दररोजच्या काही शारीरिक हालचालींसोबतच योगा करणे आवश्यक आहे. केवळ योगामुळे लगेच परिणाम दिसणार नाहीत, परंतु नियमित सरावाने काही आठवड्यांतच तुम्हाला परिणाम दिसू शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Rain : कोकणापासून विदर्भापर्यंत… पावसाने या जिल्ह्यांना झोडपलं, वीज पडून महिलेसह 22 शेळ्यांचा मृत्यू
  • ‘धुरंधर’मधल्या ‘जमील जमाली’चा नोरा फतेहीसोबत डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल
  • ओमराजे निंबाळकर नामचीन गद्दार… संजय राऊत यांचे गंभीर आरोप, 15 कोटी रूपये..
  • 6 खासदारांच्या पक्षांतरावर अण्णा हजारे भडकले, म्हणाले; श्रद्धा, निष्ठा…
  • IMD Monsoon Update : पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान विभागाकडून मोठा इशारा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in