• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘या’ 5 ठिकाणी जेवण करणे अशुभ, असं करताय तर आजच व्हा सावध, कारण…

June 24, 2026 by admin Leave a Comment


आजच्या जीवनशैलीमुळे आपण कुठेही काहीही खाऊ लागलो आहोत. हे सोपं वाटतं आणि वारंवार जेवण्यासाठी एकाच जागी बसण्याची गरज नसते. व्यवहारात हे योग्य वाटत असलं तरी वास्तुशास्त्रानुसार ही पद्धत चुकीची आहे.

अनेकदा असे दिसून येते की लोक पलंगावर बसून जेवतात. जे वास्तुशास्त्रानुसार योग्य नाही. यामुळे तुमच्या आरोग्याला आणि आर्थिक स्थितीला हानी पोहोचू शकते. शिवाय, पलंगावर बसून जेवल्याने नेहमीच मानसिक ताण येऊ शकतो. जर तुम्ही जेवायला बसणार असाल, तर ती जागा अस्वच्छ नाही याची खात्री करा. घाणीमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. त्याचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवरही परिणाम होऊ शकतो. म्हणून नेहमी स्वच्छ ठिकाणीच बसून जेवा.

जर स्वयंपाकघराजवळ पूजाघर असेल, तर जेवताना तिथे बसणं टाळावं. कारण पूजाघर हे एक पवित्र स्थान आहे. तिथे जेवल्याने ते स्थान अपवित्र होऊ शकते. मान्यतेनुसार, यामुळे देवदेवता अप्रसन्न होतात आणि घरातील सुख, शांती व समृद्धी देखील कमी होऊ शकते. अनेकदा लोक स्वयंपाकघरातच जेवायला सुरुवात करतात. वास्तूनुसार, चुलीजवळ कधीही जेवू नये. त्यामुळे मनाची शांती भंग होऊ शकतं.

वास्तुशास्त्रानुसार, दाराजवळ किंवा दाराच्या उंबरठ्यावर कधीही जेवण करू नये. यामुळे घरात दुर्दैव आणि नकारात्मक ऊर्जा येते. तसेच यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते. म्हणून, दाराजवळ जेवण करणे टाळावे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही…)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बुलढाणा : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप..
  • तुकाराम मुंढेंचा दणका! 37 हॉटेल्सवर धाडी, 4 आस्थापनांचे परवाने निलंबित, संपूर्ण राज्यात खळबळ
  • 99 टक्के लोकांना माहिती नाही बेडवरची गादी किती वर्षांनी बदलावी?
  • पुढचे 17 तास धोक्याचे… 23 राज्यांवर मोठं संकट, 80च्या स्पीडने… IMD ची मोठी अपडेट काय?
  • फोटो, इमेज आणि पिक्चर याचा अर्थ एकच होतो का? तुम्हालाही तसंच वाटतंय का? जाणून घ्या तिन्हींमधला फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in