• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या 2 दिवशी चुकूनही खरेदी करू नका मातीची भांडी, भल्याभल्यांना माहीत नसेल कारण

August 7, 2026 by admin Leave a Comment


आपल्यापैकी अनेकांच्या घरांमध्ये मातीच्या भांड्यात स्वयंपाक केला जातो. शिवाय उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी मातीची भांडी खरेदी केली जातात. तर मडक्यातील पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. मात्र वास्तूशास्त्र आणि पारंपरिक समजुतींनुसार नवीन मातीचे भांडे केव्हा खरेदी करावे, ते केव्हा टाळावे आणि योग्य निवड कशी करावी, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल वास्तूशास्त्र नियम जाणून घेऊयात.

वास्तुशास्त्रानुसार रविवारी आणि मंगळवारी मातीची भांडी खरेदी करणे टाळावे. हे दोन दिवस मातीची भांडी खरेदी करण्यासाठी अशुभ मानले जातात.

मंगळ ग्रह पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे, त्यामुळे मंगळवारी घरात मातीची भांडी आणणे योग्य नाही असे मानले जाते. याशिवाय काही पारंपरिक समजुतींनुसार शनिवारी सुद्धा मातीची भांडी खरेदी करणे टाळावे.

सूर्यास्तानंतर मातीची भांडी का खरेदी करू नये?

असे म्हटले जाते की सूर्यास्तानंतर म्हणजेच संध्याकाळी किंवा रात्री, मातीची भांडी खरेदी करून घरी आणणे अशुभ असते. मातीची भांडी नेहमी दिवसाच्या प्रकाशातच खरेदी करावीत. जेव्हा जुने भांडे फुटते किंवा नवीन भांड्याची गरज भासते, तेव्हा हे नियम लक्षात ठेवूनच खरेदी करणे उत्तम ठरते.

चमकदार किंवा रंगीबेरंगी मातीची भांडी विकत घेणे टाळा

मातीची भांडी निवडताना वास्तुशास्त्र आणि आरोग्य या दोन्ही बाबी विचारात घेणे महत्त्वाचे आहे. बाजारात मिळणारी भडक रंगांची किंवा आकर्षकपणे रंगवलेली मातीची भांडी खरेदी करणे टाळा. या भांड्यांवर रासायनिक रंग किंवा वार्निशचा लेप दिलेला असतो. अशा भांड्यांमधील पाणी प्यायल्याने किंवा जेवण शिजवल्याने त्यातील रसायने पाण्यात व जेवणात मिक्स करून तुमच्या आरोग्याला गंभीर नुकसान पोहोचू शकते.

मातीचे भांडे नीट तपासूनच खरेदी करा.

चांगली मातीची भांडी निवडण्यासाठी त्यावर बोटाने हलकेच टॅप करा. जर टॅप केल्यावर मंद किंवा निस्तेज आवाज येत असेल, तर याचा अर्थ भांडे व्यवस्थित बनलेलं नाही. असे भांडे निवडा ज्यातून मोठा आणि स्पष्ट ‘खटखट’ असा आवाज येईल. शेवटी भांडे खरेदी करण्यापूर्वी त्यात पाणी भरा आणि घरी आणण्यापूर्वी ते गळत नाही याची खात्री करा.

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमराठी रिक्षा चालकांना दणका बसणारच, कारवाई कशी होणार? मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली A टू Z माहिती दिली
  • कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in