• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या म्हातारीला काय झालं… फोटो शेअर करत नीना गुप्ता असं का म्हणाली?

July 27, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेत्री या कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या आगामी सिनेमामुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. अनेक बॉलिवूड अभिनेत्री या नेहमीच ग्लॅमरस अंदाजात दिसतात. कधीच त्या विनामेकअप दिसत नाहीत. एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री आजही वयाच्या 67व्या वर्षी चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये तिने ‘लोक म्हणतील या म्हातारीला काय झालं…’ असे म्हणत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून नीना गुप्ता आहे. नीना गुप्ता आजही जबरदस्त फॅशन सेन्स आणि दमदार अभिनयाने लोकांना प्रभावित करत असतात. त्या अनेकदा सोशल मीडियावर आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी शेअर करतात. त्यांनी मुलगी मसाबा गुप्ताने डिझाइन केलेल्या आउटफिटबाबत असा मजेशीर पोस्ट शेअर केला आहे, ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

काय आहे पोस्ट?

नीना गुप्ताने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्या खूप स्टायलिश दिसत आहेत. त्यांनी मुलगी मसाबाने डिझाइन केलेला काळ्या रंगाचा कफ्तान स्टाइल ड्रेस परिधान केला आहे. त्यांचा हा लुक खूप आकर्षक वाटत आहे. नीना यांनी शेअर केलेला फोटो तर सुंदर आहेच, पण त्यासोबत त्यांनी जे कॅप्शन लिहिले, ते सर्वांचे लक्ष आपल्याकडे ओढून घेणारे ठरले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

कॅप्शनने वेधले लक्ष

या पोस्टमध्ये नीना यांनी मुलगी मसाबाच्या डिझाइनची खूप प्रशंसा केली आहे. नीना गुप्ता यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी मसाबाचे हे क्रिएशन अनेक वेळा घातले आहे आणि प्रत्येक वेळी ते खूप नवीन आणि खास वाटते. मला खरं तर ‘खास’ ऐवजी ‘सेक्सी’ म्हणायचे होते, पण मग लोक बोलतील या म्हातारीला काय झालं?”

नीना गुप्ता अनेकदा आपली मुलगी मसाबा गुप्ताच्या कामाची प्रशंसा करताना दिसतात. मसाबा फॅशन डिझायनिंगच्या जगात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. नीना गुप्ता सतत चित्रपट आणि विविध प्रोजेक्ट्समध्ये सक्रिय आहेत. अलीकडेच त्या क्राइम थ्रिलर चित्रपट ‘वध २’मध्ये दिसल्या होत्या. हा चित्रपट ६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला होता. त्याआधी त्या रोमॅंटिक कॉमेडी चित्रपट ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’मध्ये दिसल्या होत्या. या चित्रपटात त्यांनी सपोर्टिंग भूमिका साकारली होती, ज्यात कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत होते.

नीना गुप्ता येत्या काळात ड्रामा चित्रपट ‘पचहत्तर का छोरा’मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेता रणदीप हुड्डा आणि संजय मिश्राही महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. याशिवाय त्यांच्याकडे अभिनेत्री रकुल प्रीत सिंह यांच्यासोबत एक कॉमेडी प्रोजेक्टही आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in