• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘या’ पदार्थांचे सेवन करत असाल तर आताच थांबा नाहीतर वाढू शकते ॲसिडिटी

August 8, 2026 by admin Leave a Comment


बदलत्या जीवशैलीमुळे बऱ्याच लोकांना ॲसिडिटीचा सतावत आहे. त्यामुळे छातीत जळजळ, आंबट ढेकर येणे, घशात जळजळ होणे किंवा पोटात जडपणा जाणवणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. या समस्या सामान्य आहे असा समज करून अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. मात्र ही समस्या पुन्हा उद्भवत असेल, तर आहार आणि जीवनशैली हे एक प्रमुख कारण असू शकते. त्यामुळे ही समस्या वाढण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लवकरात लवकर उपाय करणे महत्त्वाचे आहे. काही पदार्थांच्या सेवनाने तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास वाढवू शकतात . पण तुम्ही जर आरोग्यदायी आहार घेतल्यास आणि खाण्याच्या चांगल्या सवयींवर लक्ष केंद्रित केल्यास लक्षणीय आराम मिळू शकतो. आम्लपित्ता(ॲसिडिटी)चा त्रास दीर्घकाळ टिकून राहिल्यास त्यामुळे इतर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. चला तर मग ॲसिडिटीचा त्रास वाढवणारे पदार्थ कोणते? या समस्येसाठी कोणते पदार्थ सर्वोत्तम मानले जातात आणि कोणत्या सवयी टाळल्या पाहिजेत हे जाणून घेऊयात.

ॲसिडिटीचा त्रास वाढवणारे पदार्थ

अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबेटिस अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजेस (NIDDK) नुसार , काही विशिष्ट पदार्थ आम्लपित्त वाढवू शकतात. तथापि त्यांचे परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे असू शकतात. तळलेले आणि जास्त फॅटयुक्त पदार्थ पचायला जास्त वेळ लागतो, ज्यामुळे आम्लपित्त आणखी वाढू शकते.

मसालेदार पदार्थ, टोमॅटो, संत्री आणि लिंबू यांसारखी लिंबूवर्गीय फळे, चॉकलेट, पुदिना, कॉफी, चहा, कॅफीनयुक्त पेयं आणि कार्बनयुक्त पेयं देखील अनेक लोकांसाठी समस्या वाढवू शकतात. त्यामुळे कोणत्या पदार्थांमुळे तुमची ॲसिडिटीचा त्रास वाढत हे ओळखणे आणि ते टाळण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.

ॲसिडिटी टाळण्यासाठी काय खावे?

जेव्हा तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होत असेल, तेव्हा हलके आणि सहज पचणारे पदार्थ निवडा. जसे की ओट्स, केळी, हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्य, कमी फॅटचे दही, कडधान्ये आणि इतर फायबरयुक्त पदार्थ हे चांगले पर्याय आहेत. हे पदार्थ थोडे थोडे करून खाणे आणि भरपूर पाणी पिणे देखील उपयुक्त ठरू शकते.

जर एखाद्या विशिष्ट पदार्थामुळे तुमची ॲसिडिटी वाढत असेल, तर तो सेवन करणे टाळा. वेगवेगळ्या पदार्थांचा प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो, म्हणून तुम्हाला जे मानवते तेच खा.

ॲसिडिटी वाढल्यास कोणत्या सवयी टाळल्या पाहिजेत?

एकाच वेळी जास्त जेवणे टाळा आणि जेवणानंतर लगेच झोपू नका.

झोपण्याच्या 2 ते 3 तास ​​आधी रात्रीचे जेवण करा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा, कारण यामुळे ॲसिडिटी वाढू शकते.

अतिशय घट्ट कपडे परिधान केल्यानेही काही लोकांमध्ये ही समस्या आणखी वाढू शकते. जर ॲसिडिटीचा त्रास वारंवार होत असेल किंवा तो दीर्घकाळ टिकून राहत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये?

जर छातीत वारंवार जळजळ होत असेल, आंबट ढेकर येत असतील, अन्न गिळण्यास त्रास होत असेल, घशात सतत जळजळ होत असेल, वजन कमी होत असेल किंवा ॲसिडिटीचे औषध घेऊनही आराम मिळत नसेल, तर याकडे दुर्लक्ष करू नये.

ही लक्षणे जास्त दिवस टिकून राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर निदान आणि योग्य उपचारांमुळे समस्या अधिक गंभीर होण्यापासून रोखता येते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमराठी रिक्षा चालकांना दणका बसणारच, कारवाई कशी होणार? मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली A टू Z माहिती दिली
  • कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in