• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या गाण्याने संपू्र्ण देशाला रडवलं, 40 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आजही ऐकताच प्रत्येकजण रडतो

July 9, 2026 by admin Leave a Comment


1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नाम' या चित्रपटातील 'चिठ्ठी आई है' हे गाणं आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक भावनिक गाण्यांपैकी एक मानले जाते. आई, गाव, बालपण आणि कुटुंबाच्या आठवणी जागवणाऱ्या या गाण्याने देश-विदेशातील लाखो भारतीयांना अश्रू अनावर केले.

विशेष म्हणजे, हे अजरामर गाणं गाण्यासाठी गझलसम्राट पंकज उधास सुरुवातीला तयार नव्हते. या गाण्यातील विरह आणि भावनांना आपण न्याय देऊ शकू का, अशी शंका त्यांना होती. मात्र दिग्दर्शक महेश भट्ट यांनी त्यांना समजावले की, परदेशात आपल्या कार्यक्रमाला आलेल्या भारतीयांसमोर हे गाणं गात असल्याची भावना मनात ठेवून गायचे.

त्यानंतर पंकज उधास यांनी हे गाणं रेकॉर्ड करण्यास होकार दिला. रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यानंतर स्टुडिओतील अनेकजण भावूक झाले. चित्रपट प्रदर्शित झाल्यावरही या गाण्याचा प्रभाव तितकाच तीव्र होता. विशेषतः परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी हे गाणे ऐकताना आपल्या कुटुंबीयांच्या आठवणींनी अश्रू ढाळल्याचे अनेक प्रसंग घडले.

पंकज उधास यांच्या लाइव्ह कार्यक्रमांमध्येही हे गाणं ऐकताना श्रोते भावूक होत असत. एकदा तर वातावरण इतके भावनिक झाले की, कार्यक्रमानंतर त्यांनी श्रोत्यांची माफी मागत दुसरे हलकेफुलके गाणे सादर केले.

जवळपास चार दशके उलटल्यानंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम असून, आजही ते हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक भावनिक आणि अजरामर गाण्यांमध्ये गणले जाते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कुंभमेळ्याच्या खर्चावर इम्तियाज जलील यांचा आक्षेप, म्हणाले, 30 हजार कोटींमध्ये… त्या विधानाची राज्यात चर्चा
  • नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज
  • रवींद्र जडेजा-सारांश जैनच्या नो बॉलमुळे टीम इंडियाची डोकेदुखी, प्रशिक्षकाने थेट सांगितला जालीम उपाय
  • Snake Safety Tips In Monsoon : कारच्या इंजिनापासून टॉयलेटपर्यंत… पावसाळ्यात साप इथेच का लपतात?
  • Aashirvaad Atta: तुम्हीसुद्धा ‘आशीर्वाद’चं पीठ खाता? मग हायकोर्टाच्या या अपडेटकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in