• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

श्रेयस अय्यरला ट्रोल करणाऱ्यांना बहीण श्रेष्ठाने सुनावलं, म्हणाली..

July 9, 2026 by admin Leave a Comment

भारतीय टी20 संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडून काढून ते श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आलं आहे. पण त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाला सलग पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्याच्या पाच सामने खेळले गेले आणि एकातही विजय मिळालेला नाही. आयर्लंडविरुद्धसारख्या दुबळ्या संघाविरूद्धही भारताने 0-2 ने मालिका गमावली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धचा पहिला टी20 सामना पावसामुळे झाला नाही. मात्र त्यानंतर झालेल्या दोन्ही टी20 सामन्यात भारताचा पराभव झाला. असं असताना सहाजिकच श्रेयस अय्यरवर टीकेचा भडिमार होईल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळत असलेल्या संघाला इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. तरच मालिका बरोबरी सुटेल, अन्यथा ही मालिका गमवण्याची वेळ येईल. असं असताना आता त्याच्या बचावासाठी श्रेष्ठा अय्यर मैदानात उतरली आहे. तिने तिच्या शैलीत टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे. एका मुलाखतीत श्रेष्ठा म्हणाला की, विराट कोहली आणि रोहित शर्मा उत्कृष्ट कर्णधार राहिले आहेत. पण त्यांनी अनेक सामने गमावले आहेत.

श्रेष्ठा अय्यर काय म्हणाली?

फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत श्रेष्ठा अय्यर म्हणाली की, ‘क्रिकेट हा खूप प्रसिद्धीचा खेळ आहे. खेळपट्टी कशी आहे हे तुम्हाला माहीत नसते. ती गोलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टी आहे की फलंदाजीसाठी, हेही तुम्हाला माहीत नसते. तुम्ही फक्त त्याचे कर्णधारपद कसे आहे हे पाहता. कर्णधार म्हणून त्याने जिंकलेले सामनेही तुम्ही पाहिले पाहिजेत. जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता, तेव्हा त्यासोबत अनेक गोष्टी येतात. आजपर्यंतच्या प्रत्येक कर्णधाराने चांगली कामगिरी केली आहे. शुबमन गिल असो, विराट कोहली असो, रोहित शर्मा असो, ते सर्व महान खेळाडू आहेत. पण ते अनेक सामने हरलेही आहेत.’

जर कोणी श्रेयस अय्यरच्या मागे लागलं असेल, तर त्यांना समस्या आहे; असं अय्यरने पुढे सांगितलं. श्रेष्ठा अय्यर म्हणाला की, ‘जर तुम्ही सतत श्रेयस अय्यर, श्रेयस अय्यर असेच म्हणत असाल , तर तुम्हाला त्याच्याशी नक्कीच काहीतरी अडचण आहे. पण मी तुम्हाला सांगतो, श्रेयस अय्यर अप्रतिम आहे. त्याची प्रतिमा पूर्णपणे वेगळी आहे. मला वाटते की त्याच्याइतके देण्यासारखे दुसरे कोणीही नाही. ती वेळ लवकरच येईल. तो काळ येईल जेव्हा लोक म्हणतील की श्रेयस अय्यर हा भारताने आजवर निर्माण केलेल्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे.’

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इंग्लंड क्रिकेट टीमच्या ‘त्या’ Video वरून गोंधळ! बेन स्टोक्स फिरकी घेत म्हणाला काढून टाका
  • श्रेयस अय्यरपेक्षा या भारतीय कर्णधारांचा टी20 क्रिकेटमध्ये वाईट रेकॉर्ड, सर्वाधिक सामने कोणी गमावले? जाणून घ्या
  • Shah Rukh Khan : शाहरुख खानची सर्वात मोठी डील, या राज्यात खरेदी घेतली प्रॉपर्टी; दोन फ्लोअरसाठी मोजले इतके कोटी
  • अयोध्येच्या राम मंदिरात कधी आणि कशी व्हायची नोटांची चोरी? चौकशीतून मोठी माहिती समोर
  • घरात काच लावण्यापूर्वी ‘हे’ वास्तु नियम जाणून घ्या, अन्यथा वाढू शकतात समस्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in