
टी20 संघाचं नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरवर चोहूबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. आयर्लंडविरुद्ध टी20 मालिका गमावल्यानंतर इंग्लंडमध्येही मालिका गमवण्याची भीती आहे. असं असताना त्याच्या बहिणीने त्याची पाठराखण केली आहे. तिने एका मुलाखतीत सांगितलं की, विराट-रोहित चांगले कर्णधार होते. पण त्यांनीही सामने गमावले आहेत. त्यामुळे कोणाच्या नेतृत्वात सर्वाधिक सामने गमवले गेले याची चर्चा सुरू झाली आहे. (फोटो-PTI)
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात गमावले आहे. महेंद्रसिंह धोनीने देश, आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकूण 331 सामन्यात नेतृत्व केलं. यावेळी 134 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. 100हून अधिक टी20 सामने गमावणारा एकमेव भारतीय कर्णधार आहे. (फोटो-PTI)
विराट कोहलीच्या नेतृत्वात टी20 क्रिकेटमध्ये 87 सामने गमावले आहेत. त्याने 193 टी20 सामन्यात कर्णधारपद भूषवलं होतं. विराट कोहलीने रोहित शर्माच्या तुलनेत कमी सामन्यात कर्णधारपद भूषवलं. पण त्यात सर्वाधिक सामने गमावले आहेत. (फोटो-PTI)
रोहित शर्माने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 225 टी20 सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. यात 82 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर गौतम गंभीरने 170 सामन्यात नेतृत्व केलं आणि त्यापैकी 71 सामने गमावले आहेत. (फोटो-PTI)
संजू सॅमसनने 105 टी20 सामन्यात कर्णधारपद भूषवलं आणि त्यापैकी 49 सामने गमावले आहे. तर सध्या कर्णधारपदाची धुरा असलेल्या श्रेयस अय्यरने 119 टी20 सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. त्यापैकी 47 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. (फोटो-PTI)




Leave a Reply