• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : घरात कधीही हे फोटो लावू नका; मन राहील कायम अशांत, सुख शांती होते गायब

July 9, 2026 by admin Leave a Comment


वास्तुशास्त्र हे सामान्यपणे पॉझिटिव्ह ऊर्जा आणि निगेटिव्ह ऊर्जा या दोन तत्वावर कार्य करते. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो आणि घरातील ऊर्जा संतुलन बिघडतं. जेव्हा तुमच्या घरातील ऊर्जा संतुलन बिघडतं तेव्हा त्याचा परिणाम हा तुमच्या शारीरिक तसेच मानसिक स्वस्थ्यावर देखील होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे घरातील ऊर्जा संतुलन टिकून ठेवणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. आज आपण यातीलच काही उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार असे काही फोटो असतात, जे घरात लावता कामा नये, यामुळे घरातील ऊर्जा संतुलन बिघडू शकतं. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेकमं काय सांगण्यात आलं आहे?  त्याबद्दल.

युद्धाच्या प्रसंगाचे फोटो – वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही युद्धाच्या प्रसंगाचे फोटो असू नयेत. यामुळे मन कायम अस्वस्थ होतं. घरातील सकारात्मक ऊर्जेचा नाश होऊन, नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. यामुळे ऊर्जा संतुलन बिघडतं. जर तुमच्या घरात युद्धाच्या प्रसंगाचे फोटो असतील तर त्याचा थेट तुमच्या मनावर परिणाम होतो आणि त्यामुळे तुमचं मन देखील चिडचिड होतं. घरात शांत वातावरण राहत नाही, त्यामुळे घरात कधीही युद्धाच्या प्रसंगाचे फोटो लावू नये, असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

काटेरी झाडांचे फोटो – वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही काटेरी झाडांचे फोटो किंवा काटेरी झाड लावू नये, यामुळे घरात गृह कलह वाढतो. घरातील शांतता भंग पावते. काहीही कारण नसताना पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणं होतात. त्यामुळे घरात शक्यतो असे फोट लावणं टाळलं पाहिजे असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे घरात कधीही मावळत्या सूर्याचा फोटो असू नये, त्याऐवजी घरात उगवत्या सूर्याचा फोटो लावावा असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सनी लिओनीचं प्रचंड रोमँटिक पावसामधील गाणं, 100 वेळा ऐकलं तरी भरत नाही मन, प्रत्येकाच आवडतं
  • या झाडांची पानं म्हणजे सापांपासून बचावाचं सुरक्षाकवचच, भुकटी तयार करून घराच्या या भागात ठेवा, साप पुन्हा कधीच दिसणार नाही
  • Chanakya Niti : कुटुंबप्रमुखाने ही तीन काम केलीच पाहिजेत, अन्यथा आयुष्यात येते पश्चातापाची वेळ, चाणक्य काय सांगतात?
  • श्रेयस अय्यरशी संपर्क साधण्यासाठी मुली काय करायच्या? बहीण श्रेष्ठाने गुपित केलं उघड
  • MLC T20: 144 धावांचे लक्ष्य गाठताना प्रिटोरियसचं विश्वविक्रमी शतक, गिलख्रिस्टचा विक्रम मोडला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in