• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

यालाच म्हणतात माज आणि मुजोरी, मरीन ड्राईव्हवर रात्री 2 वाजता धक्कादायक प्रकार, थेट लोक..

July 7, 2026 by admin Leave a Comment


काल मुंबईमध्ये भारतीय हवामान विभागाने मोठा अलर्ट जारी केला होता. वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: याबाबत माहिती देत लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. पावसासोबतच जोरदार वारे वाहत होते. शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालये यांना सुट्टी जाहीर करण्यात आली. खासगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांना वर्कफ्रॉम होम देण्याच्या सूचना देण्यात आल्या. समुद्राच्या जवळ न जाण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. काल मुंबईमध्ये समुद्राला मोठी भरती होती. फक्त मुंबईच नाही तर अनेक भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आपत्ती व्यवस्थान कक्षाला भेट देत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात होते. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनीही नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.

काल रात्री 2 वाजता काही मुंबईकरांनी कहर केला. मुख्यमंत्र्यांच्या आणि प्रशासनाच्या अलर्टला थेट केराची टोपली दाखवली. समुद्राला प्रचंड मोठी भरती असून उंच लाटा असणार आहेत, हे सांगितल्यानंतरही समुद्राला भरती असतानाही रात्री 2 वाजता मुंबईकर मरीन ड्राईव्ह परिसरात होते. यादरम्यान उंच लाटा उसळत होत्या. समुद्राचे एक राैद्ररूप यादरम्यान दिसत होते.

स्वतःचा जीव धोक्यात घालून मुंबईकर समुद्रकिनारी दाखल झाली होती. यादरम्यान सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रेड अलर्ट होता, समुद्रात मोठी भरती होती. तरी देखील एकही पोलिस मरीन ड्राईव्ह परिसरात उपस्थित नव्हते. मरीन ड्राईव्ह परिसरात पोलिसांचा एकही जवान नाही समुद्राच्या मोठ्या लाटा उसळत असताना पोलिसांचे नागरिकांकडे दुर्लक्ष दिसून आले.

हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी केला. मुंबईकर मरीन ड्राईव्ह परिसरात मुख्यमंत्री आणि प्रशासन यांच्या आवाहनाला केरांची टोपली दाखवत मोठ्या संख्येने मरीन ड्राईव्ह परिसरात पोहोचले होते. यादरम्यान फोटो व्हिडीओ काढण्याचे काम सुरू होते. यावेळी काही लहान मुलेही आपल्या पालकांसोबत दाखल झाली होती. सर्वजण आपला जीव धोक्यात घालताना दिसले. मुंबई पोलिसांचे मरीन ड्राईव्ह परिसरात दुर्लक्ष दिसून आले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in