• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

यापेक्षा वाईट काहीच नाही, प्रेग्नंसी टेस्ट, चुकीचा स्पर्श..; अभिनेत्रीने सांगितला तुरुंगातील धक्कादायक अनुभव

April 24, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर संदिपा वर्क गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. जवळपास सहा कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगप्रकरणी संदिपाला तुरुंगवास भोगावा लागला होता. चार महिने ती तिहार तुरुंगात कैद होती. आता जामिनावर सुटल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत संदिपाने तिचा तुरुंगातील धक्कादायक अनुभव सांगितला आहे. तुरुंगात जाण्यापूर्वीच समाज आणि व्यवस्था तुम्हाला गुन्हेगार मानतात आणि तिथे तपासणीच्या नावाखाली जे काही घडतं, ते कोणत्याही व्यक्तीचा स्वाभिमान धुळीस मिळवण्यासाठी पुरेसं आहे, असं ती म्हणाली. ज्योत्स्ना बेदीच्या पॉडकास्टमध्ये संदिपाने तिहार तुरुंगातील सत्य उघड केलं.

संदिपाने सांगितलं की, तुरुंगात जाण्यासाठी होणारी तपासणी आणि प्रक्रिया इतकी अपमानजनक असते की व्यक्तीला आपला आत्मसन्मान गमावल्यासारखं वाटतं. “ज्यांचे ब्रेस्ट मोठे असतात, अशा महिलांना आणखी अपमानास्पद वागणूक दिली जाते. खाली काही लपवलं आहे का, हे तपासण्यासाठी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला जातो. अनेकांनी मला विचारलं की तुरुंगात माझ्यासोबत जे काही घडलं, त्याचा खुलासा मी का करतेय? मी कोणालाही घाबरत नाही. मी का घाबरावं? तिथे ड्युटीवर असलेल्या मॅडमसुद्धा खूप उद्धटपणे वागतात. काही चांगल्या आहेत, पण बहुतेक जणी उद्धटच आहेत. मी खूप काही सहन केलंय आणि मला वाटत नाही की आयुष्यात माझ्यासोबत यापेक्षा आणखी काही वाईट घडेल”, असं संदिपा म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jyotsna Bedi Thukral (@bedijyotsnaofficial)

अपमानजनक वैद्यकीय चाचण्यांना सामोरं जाण्याविषयी आणि अनोळखी व्यक्तींकडून मिळणाऱ्या असंवेदनशील वागणुकीबद्दल तिने पुढे सांगितलं, “ते मला माझ्या घरातून घेऊन गेले आणि सर्वांत आधी दीन दयाल रुग्णालयात नेलं. तिथे माझी प्रेग्नंसी टेस्ट करण्यात आली. ते मला रात्रीच्या वेळी तिथे घेऊन गेले होते आणि तिथल्या नुकत्याच डॉक्टर बनलेल्या तरुणांनी सांगितलं की, हिची प्रेग्नंसी टेस्ट करा. हे खूपच लज्जास्पद होतं. तुमच्याकडे ते अत्यंत घाणेरड्या नजरेनं पाहतात. न्याय मिळण्यापूर्वीच एखाद्याला गुन्हेगार का ठरवलं जातं?”

संदिपाचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिला ईडीने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अटक केली होती. 2025 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला. त्यापूर्वी चार महिन्यांहून अधिक काळ तिने तिहार तुरुंगात घालवला होता. या मुलाखतीत तुरुंगातील काळाबद्दल बोलताना संदिपा ढसाढसा रडली. “तिहार हे एक असं ठिकाण आहे, जिथे मी माझ्या शत्रूंनाही पाठवण्याची इच्छा बाळगणार नाही. मी अक्षरश: तिथे प्रार्थना करायची की माझा मृत्यू व्हावा. त्यातही सर्वांत वाईट भावना तेव्हा येते, जेव्हा तुमच्या आईवडिलांना तुम्हाला भेटण्यासाठी तुरुंगात यावं लागतं. मी त्यांचीसुद्धा माफी मागितली.”





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 6300mAh बॅटरी असलेला हा पॉवरफूल फोन झाला लाँच, 6 वर्षांपर्यंत मिळतील अपडेट्स
  • फुटपाथवर साडी विकणारा, ते टॉप प्रोड्युसर..! कसं उभ केलं कोट्यवधींचं साम्राज्य ?
  • West Bengal Election 2026 : पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर 152 पैकी भाजप बंगालमध्ये किती जागा जिंकणार? अमित शाह यांचा मोठा दावा
  • महादेवांची झलक, कोट्यवधींची चमक…Anant Ambani ची नवीन घड्याळ पाहिली का? किंमतीनेच घाम फुटणार
  • मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीच्या निर्णयावर सरकारचं सर्वात मोठं पाऊल, सरकारने थेट…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in