
जगातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंबात अंबानींचं नाव आघाडीवर आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्स समूहाच्या छताखाली अनेक ब्रँड आणि कंपन्यांचं साम्राज्य उभं केले आहे. मुकेश अंबानी यांचं अँटेलिया हे आलिशान घरं असो वा त्यांच्या विविध कंपन्यांचा कारभार नेहमी चर्चेत असते. त्यांचा मुलगा अनंत अंबानी याचे लग्न तर मोठा इव्हेटं ठरले. तर त्याचा वनतारा हा ड्रीम प्रोजेक्ट आणि तिथले प्राणी हे कायम चर्चेत असतात. आता अनंत अंबानीच्या हातातील घड्याळाची देशभरात मोठी चर्चा आहे. काय आहे असं त्या घड्याळात?
हर हर महादेव
अनंत अंबानी यांना घड्याळाची फार आवड आहे. त्याच्याकडे घड्याळांचं मोठं कलेक्शन आहे. जगातील जवळपास सर्वच ब्रँडची घड्याळं त्यात आहेत. पण त्याच्या या नवीन घड्याळंने सर्वांचंच लक्ष वेधले आहे. हे घड्याळ अत्यंत महागडे मानले जात आहे. कारण या घड्याळात महादेवाची प्रतिमा आहे. ही घड्याळ जेकब अँड को यांची ओपेरा गॉडफादर बगेट शिवा वॉच आहे.

10 ते 12 कोटी किंमत
या घड्याळाचं खास वैशिष्ट्ये म्हणजे त्यात भगवान शिव यांची बसलेली मनमोहक मूर्ती आहे. हे घड्याळ 18K सोन्यापासून तयार करण्यात आलेले आहे. यामध्ये 300 हून अधिक छोटे हिरे कट तर 1000 हून अधिक हिरे आहेत. या घड्याळात 658 छोटे-छोटे सुट्टे भाग आहे. या घड्याळ्याची किंमत जवळपास 10 ते 12 कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे.
या Anant Ambani Lord Shiva watch price फिरणारा टुर्बिलन दिसते. त्यामुळे घड्याळ अधिक आकर्षक दिसते. या घडाळ्यात एक म्युझिक बॉक्स सुद्धा बसवलेला आहे. त्यातून एक खास स्वर बाहेर पडतो. त्याच्या डायलवर ओम असे लिहिलेले आहे. त्यामुळे हे घड्याळ अजून अध्यात्मिक होते. ही घड्याळ जितकी आलिशान आणि महागडी आहे. तितकीच ती भगवान शंकरामुळे अध्यात्मिक झाली आहे. या घडाळ्यातील शंकराच्या मूर्तीने चित्त प्रसन्न होते. हे घड्याळ शिवभक्तीचे प्रतिक ठरले आहे. हे घड्याळ जेकब अँड को यांच्या लोकप्रिय ओपेरा मालिकेतील एक खास भेट आहे. ही घड्याळ जगभरात एकमेव आहे. Jacob & Co ने हे घड्याळ केवळ अनंत अंबानी यांच्यासाठी तयार केले आहे.
Leave a Reply