• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RCB vs GT : साई सुदर्शनची ऐतिहासिक कामगिरी, ख्रिस गेलचा महारेकॉर्ड उद्धवस्त

April 24, 2026 by admin Leave a Comment

गुजरात टायटन्सचा युवा आणि विश्वासू फलंदाज साई सुदर्शन याला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. त्यामुळे साईवर टीका करण्यात येत होती. मात्र साईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरूद्धच्या सामन्यातून जोरदार कमबॅक केलं. साईने एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई करत चौफेर फटकेबाजी केली. साईने फटकेबाजी करुन अर्धशतक झळकावलं. साईने अर्धशतकानंतरही हाच तडाखा कायम ठेवला. साईने पाहता पाहता शतकही पूर्ण केलं. साईने या खेळीदरम्यान मोठा विक्रम मोडीत काढला.

साईकडून ख्रिस गेलचा रेकॉर्ड ब्रेक

An Elite List 🤩

Sai Sudharsan tops this table surpassing some accomplished #TATAIPL batters 🔥

WATCH HIS INNINGS TODAY ▶ https://t.co/7XVDIR7vO7#KhelBindaas | #RCBvGT | @gujarat_titans pic.twitter.com/dlZRfg0IAf

— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2026

साई आयपीएल स्पर्धेत कमी डावांत वेगवान 2 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. साईने यासह ख्रिस गेल याचा रेकॉर्ड ब्रेक केला. साईने ख्रिस गेल याच्या तुलनेत 1 डावाआधी आयपीएल कारकीर्दीत वेगवान 2 हजार धावा करण्याचा विक्रम केला. ख्रिस गेल याने 48 डावांत 2 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. तर साईला 2 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी 47 डावांचा सामना करावा लागला.

तसेच चेंडूंबाबत वेगवान 2 हजार धावा करण्याचा विक्रम हा सनरायजर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या ओपनर अभिषेक शर्मा याच्या नावावर आहे. अभिषेकने 1 हजार 193 चेंडूत 2 हजार धावांचा टप्पा गाठला. तर साईला 2 हजार धावांपर्यंत पोहचण्यासाठी 1 हजार 361 चेंडूंचा सामना करावा लागला.

सर्वात कमी डावांत 2 हजार धावा करणारे फलंदाज

साई सुदर्शन : 47 डाव
ख्रिस गेल : 48 डाव
शॉन मार्श : 52 डाव
ऋतुराज गायकवाड : 57 डाव
केएर राहुल : 60 डाव

साईने किती धावा केल्या?

दरम्यान साई आरसीबी विरुद्ध शतक करणारा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील 15 वा फलंदाज ठरला. साईने 57 बॉलमध्ये 11 चौकार आणि 5 षटकारांसह शतक पूर्ण केलं. साईचं आयपीएलमधील हे एकूण तिसरं शतक ठरलं.

साईला शतकानंतर आणखी काही धावा जोडण्याची संधी होती. मात्र साईच्या खेळीला आरसीबीचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने ब्रेक लावला. जोशने शतकानंतर दुसऱ्याच बॉलवर साईला आऊट केलं. अशाप्रकारे साईच्या खेळीचा शेवट झाला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • SAW vs INDW : टीम इंडियासाठी प्रतिष्ठेचा सामना, चौथ्या सामन्यातरी जिंकणार का?
  • DC vs PBKS Live Streaming : दिल्लीसमोर पंजाबचं आव्हान, सहाव्या विजयापासून रोखणार? सामना किती वाजता?
  • RR vs SRH Live Streaming : राजस्थान आणि हैदराबादमध्ये कडवी झुंज, कोण करणार हल्लाबोल?
  • RCB vs GT : साई सुदर्शनची ऐतिहासिक कामगिरी, ख्रिस गेलचा महारेकॉर्ड उद्धवस्त
  • तुमच्या मोबाईलमध्ये हवेच हे 5 सरकारी ॲप, सरकारी कामे होती चुटुकीसरशी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in