• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

यशच्या ‘टॉक्सिक’मुळे श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’चं पाऊल मागे? घेणार महत्त्वाचा निर्णय

July 16, 2026 by admin Leave a Comment


‘केजीएफ’ स्टार यशची मुख्य भूमिका असलेल्या ‘टॉक्सिक’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. हा चित्रपट ‘धुरंधर 2’सोबतच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, मात्र नुकसान टाळण्यासाठी निर्मात्यांनी प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता ‘टॉक्सिक’सोबतची टक्कर टाळण्यासाठी अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या बहुचर्चित ‘ईठा’च्या प्रदर्शनाबाबत निर्माते महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या विचारात आहेत. ‘टॉक्सिक’ या चित्रपटाविषयी सोशल मीडियावर तुफान क्रेझ पहायला मिळतेय. त्यामुळे थिएटरमध्ये हा चित्रपट ब्लॉकबस्टर होण्याची शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र यामुळे त्याचवेळी प्रदर्शित होणाऱ्या इतर चित्रपटांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेला बायोपिक ‘ईठा’ हा येत्या 28 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा आणि लावणी कलाकार विठाबाई भाऊ मांग नारायणगांवकर यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. तर दुसरीकडे यशचा ‘टॉक्सिक : अ फेरीटेल फॉर ग्रोन अप्स’ हा चित्रपट 26 ऑगस्ट रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, निर्माते आता ‘टॉक्सिक’सोबतची टक्कर टाळण्यासाठी ‘ईठा’च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा विचार करत आहेत. श्रद्धा कपूरचा हा चित्रपट एकतर ‘टॉक्सिक’च्या आधी किंवा त्याच्या नंतर काही दिवसांनी प्रदर्शित करण्याबद्दल निर्मात्यांमध्ये विचारविनिमय सुरू आहे. याची अधिकृत घोषणा येत्या काही दिवसांतच केली जाईल. चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते, दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करण्यास पात्र आहेत. त्यामुळे एकाच वेळी प्रदर्शित केल्यास त्याचा फटका कोणत्या तरी एका चित्रपटाला किंवा दोघांना बसू शकतो.

‘ईठा’चं दिग्दर्शन ‘छावा’ फेम लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून या चित्रपटाच्या टीझरमधील श्रद्धाच्या लूकने आणि एकंदर कथेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ‘ईठा’ या चित्रपटात 1940 ते 1990 च्या दशकापर्यंतचा त्यांचा प्रवास उलगडण्यात येणार आहे. यामध्ये त्यांचा संघर्ष आणि त्यांना मिळालेलं यश अत्यंत सुंदररित्या चित्रित करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे यशची मुख्य भूमिका असलेला ‘टॉक्सिक’ हा त्याच्या बिग बजेट, कलाकार आणि सीन्समुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने यश आणि कियारा अडवाणीची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट… नेमकं काय घडलं?
  • काहीही झाले तरीही सर्वात अगोदर विचारपूस करण्यासाठी मला या व्यक्तीचा फोन येतो, तुकाराम मुंढे यांचा खुलासा..
  • तू मला ताप भरवूनच इथून जा…! सामना सुरू असताना ऋषभ पंत असं का म्हणाला? मैदानात काय घडलं?
  • अचानक कॉल आला… मला माफ करा, कुणालच्या मावशीने सांगितला अखेरचा संवाद; Khavdya Dongar प्रकरणात मोठी अपडेट
  • अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग… सुषमा अंधारे संतापल्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in