• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार? दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, 2 नावांची जोरदार चर्चा

September 6, 2026 by admin Leave a Comment


भाजपच्या संघटनेत बदल झाल्यानंतर आता केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळातही मोठा फेरबदल होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी खासदारांनी दिल्लीत मुक्काम ठोकला आहे. पावसाळी अधिवेशन देखील स्थगिती झालेले नाही. त्यामुळे खासदारांना कधीही बोलावले जाऊ शकते. त्यामुळे मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी संघटनेत फेरबदल केले. त्यामुळे मोदींच्या कॅबिनेटमध्ये फेरबदल होणार असल्याची चर्चा आहे. सरकारमध्ये अनेक मंत्रिपद रिक्त आहेत. नव्याने भाजपशी हातमिळवणी केलेल्या राजकीय पक्षांना मंत्रि‍पदाची अपेक्षा आहे. राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी चर्चा सुरू आहे. त्यामुळे खासदारांच्या आशा आणखी वाढल्या आहेत .

संसदेचे अधिवेशन बोलावण्याची शक्यता

संघटन आणि सरकारमध्ये कोणाचं आधी विस्तार होणार, याविषयी जोरदार चर्चा होती. आता संसदेचे अधिवेशन कधीही बोलावण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. संसदेच्या अधिवेशनात महिला आरक्षण सुधारणा विधेयक आणि मतदारसंघ पुर्नरचना विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. मागच्या अधिवेशनात दोन्ही विधेयक सत्ताधाऱ्यांकडून मंजूर झाले नाही. विरोधकांनी विरोध दर्शवल्याने संख्याबळ कमी पडल्यामुळे दोन्ही विधेक पडले. आता या विधेयकासाठी इतर राजकीय पक्षांचा पाठिंबा आवश्यक असल्याचे सत्ताधाऱ्यांना समजले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये 2027 साली विधानसभा निवडणूक होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीचा देखील विचार केला जाईल. पंतप्रधान मोदी यांच्यासहित केंद्र सरकारमध्ये उत्तर प्रदेशातील 11 मंत्री आहेत. लखनौचे खासदार राजनाथ सिंह हे संरक्षण मंत्रि‍पदाची जबाबदारी सांभाळत आहे. या व्यतिरिक्त पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी हे देखील उत्तर प्रदेसातून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. या व्यतिरिक्त बीएल वर्मा, एसपी सिंह बघेल, अनुप्रिया पटेल, जितीन प्रसाद, पंकज चौधरी, कमलेश पासवान, कीर्तिवर्धन सिंह यांच्याही नावाचा समावेश आहे.

भाजपच्या वर्तुळात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ज्या बड्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातून लक्ष्मिकांत वाजपेयी यांना पद मिळू शकते. तर माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्या नावाची चर्चा आहे. सध्या त्यांची नियुक्ती अंदमान निकोबारचे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सर्व ठिकाणी आंदोलन सुरु, काहीतरी चुकतंय.. सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान..
  • IND vs PAK: पाकिस्तानला पराभव जिव्हारी लागला, सामना गमावताच कॅप्टननं दिली नको ती कारणं
  • Rasika Dugal: बीना भाभीने सांगितला 81 वर्षांच्या बाऊजींसोबत इंटीमेट सीन देण्याचा अनुभव, नेमकं काय म्हणाली?
  • काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन, कारण…
  • आधीच भाजप श्रेष्ठींची नाराजी, आता वडीलांच्या घोडचुकीने कृष्णराज महाडिकांना धक्का, धनंजय महाडिक यांचे ते वक्तव्य चर्चेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in