• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी राजकीय घडामोड, मायावतींनी थेट पुतण्यालाच पक्षातून काढले; सासऱ्यामुळे अडचणी?

September 10, 2026 by admin Leave a Comment


उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी त्यांचा पुतण्या आकाश आनंद यांना पक्षातून काढून टाकलं आहे. मायावती यांनी यापूर्वी 3 सप्टेंबर 2026 रोजी आकाश आनंदला पक्षाचे राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवलं होतं. मात्र आता मायावती यांनी आकाश आनंद यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदावरून मुक्त केलं आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच मायावती यांनी हा मोठा निर्णय घेतल्याने उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

आकाश आनंद यांचे सासरे आणि माजी राज्यसभा सदस्य अशोक सिद्धार्थ यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर मायावतींनी प्रतिक्रिया दिली होती. अशोक सिद्धार्थ यांनी आधीच हा निर्णय घेतला असता तर आकाशला पक्षाच्या पदावरून हटवलं गेलं नसतं, असं मायावती म्हणाल्या होत्या. अशोक सिद्धार्थ यांनी वेळीच निर्णय घेतला नाही. त्यामुळे आकाश आनंद यांना सातत्याने अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे संपूर्ण वातावरण त्यांच्या विरोधात गेल्याचं मायावती म्हणाल्या.

डबल माइंड व्यक्ती…

मायावती यांनी ट्विट करून आकाश आनंद यांच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली आहे. आकाश पूर्वी माझ्या सर्व एक्स पोस्ट रिपोस्ट करायचे. पण अशोक सिद्धार्थशी संबंधित माझी पोस्ट त्यांनी रिपोस्ट केली नाही. यावरून आकाश पक्षापेक्षा कुटुंबाला अधिक महत्त्व देत असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे जो व्यक्ती डबल माइंड होऊन काम करतो, तो पक्षाचं काय भलं करेल? असा सवाल मायावतींनी उपस्थित केला आहे.

आधीच संन्यास घेतला असता तर…

मायावती यांनी आकाश आनंद यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सिद्धार्थ यांना जर आकाश आनंदच्या भविष्याची आणि बहुजन चळवळीची चिंता असती तर त्यांनी आधीच राजकारणातून संन्यास घेतला असता. पण त्यांची नियत आणि वैयक्तिक महत्त्वकांक्षेवर अजूनही प्रश्नचिन्ह आहेत, असं मायावती यांनी म्हटलं आहे.

सर्वजन हिताय, सर्वजन सुखायचा नारा

मायावतींनी हा मोठा निर्णय घेतल्यानंतर कार्यकर्त्यांवर मोठी कामगिरी दिली आहे. विरोधकांच्या चालबाजीचा मुकाबला करा. उत्तर प्रदेशमध्ये 2027मध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत सर्वजन हिताय, सर्वजन सुखायच्या सिद्धांतावर काम करायचं आहे. सर्वांनी एकजुटीने काम करून पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करायचं आहे, असं आवाहन मायावती यांनी केलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव तुफान चर्चेत
  • मोठी घडामोड! संजय राऊतांकडून पहिल्यांदाच शिंदेंच्या मंत्र्याचं कौतुक; मनातलं सगळं सांगून टाकलं
  • Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांनी स्वरा भास्करला झापलं? नेमकं काय म्हणाल्या वाचा
  • Babanrao Taywade: कुणबी नोंदीत मोठा घोळ, एकच नाव पाच वेळेस? बबनराव तायडवाडे यांच्या दाव्याने खळबळ, सरकारकडे केली मोठी मागणी
  • Rani Mukerji: राणी मुखर्जीचं अस्खलित मराठी भाषण; मराठमोळ्या अंदाजाने जिंकली महाराष्ट्राची मनं!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in