
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने काही दिवसांपूर्वी संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत सिनेमाबाबत केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. तिने सिनेमाच्या क्लायमॅक्स सीनमधील जौहरबाबत मांडलेल्या मतामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. स्वरा भास्करला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना स्वरा भास्करच्या पद्मावत सिनेमातील जौहरबाबत केलेल्या वक्तव्यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “मला त्यांना उत्तर द्यायचे नाही. कारण त्यांनी त्यांचा दृष्टिकोन व मत मांडले आहे.
पुढे त्या म्हणाल्या, “पण, मला असे वाटते की, प्रत्येक स्त्रीसाठी तिचा आत्मसन्मान हा सर्वांत महत्त्वाचा असतो. आत्ताचा जो काळ आहे, तो खूप वेगळा आहे. त्यामुळे तुम्ही आताच्या काळाची आणि त्या काळाची तुलना करू शकत नाही.
शेवटी त्या म्हणाल्या, त्या काळात त्यांनी या प्रकारे आपला आत्मसन्मान राखला असावा, असे वाटले म्हणून त्यांनी एवढं मोठं बलिदान दिले. तेव्हा तिछे कोणताच न्याय, न्यायालय किंवा पोलीस नव्हते. खिलजीच्या हाती लागण्यापेक्षा अग्नीच्या स्वाधीन करणे त्यांना योग्य वाटलं.
स्वराने चित्रपटातील जौहरच्या दृश्याबाबत वक्तव्य करत प्रश्न उपस्थित केला होता की, “अशा प्रकारच्या दृश्याचा लैंगिक हिंसाचार सहन केलेल्या महिलांवर काय परिणाम होऊ शकतो?”




Leave a Reply